अकरावी तिसरी कट आॅफ रद्द
By Admin | Updated: July 7, 2015 03:16 IST2015-07-07T03:16:48+5:302015-07-07T03:16:48+5:30
एमकेसीएलच्या तांत्रिक घोळामुळे कट आॅफ मंगळवारी दुपारी ३ वाजता जाहीर करणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले.

अकरावी तिसरी कट आॅफ रद्द
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तिसरी कट आॅफ लिस्ट सोमवारी जाहीर झालीच नाही. एमकेसीएलच्या तांत्रिक घोळामुळे कट आॅफ मंगळवारी दुपारी ३ वाजता जाहीर करणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले.
पहिल्या दोन कट आॅफनंतर तिसऱ्या कट आॅफची वाट पाहणारे विद्यार्थी सायंकाळी ५ वाजल्यापासून प्रतीक्षेत होते. मात्र सायंकाळी ८ वाजता संकेतस्थळावर कट आॅफ मंगळवारी जाहीर होणार असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. (प्रतिनिधी)