Join us  

अकरावी ऑनलाइन प्रवेश आजपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 6:10 AM

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांनी हे वेळापत्रक अकरावी प्रवेशांच्या https://mumbai.11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे

मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला असून २६ नोव्हेंबरपासून ती सुरू हाेईल. सद्यस्थितीत शिक्षण संचालनालयाने नियमित फेरी २चे वेळापत्रक जाहीर केले असून, नियमित फेरी ३ व विशेष फेरीचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल. या प्रक्रियेदरम्यान प्रवेश शुल्क, प्रवेश निश्चिती ऑनलाइन करायची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांनी हे वेळापत्रक अकरावी प्रवेशांच्या https://mumbai.11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. मुंबई एमएमआर क्षेत्रासह, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, नागपूर या महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीचे प्रवेश या वेळापत्रकानुसारच हाेतील. यापूर्वी एसईबीसी वर्गातून अर्ज भरलेल्यांना प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर वर्ग बदलाची संधी दिली जाईल. नियमित फेरी २ साठी विद्यार्थ्यांना या दरम्यान अर्ज करायचे असून, त्यांना पसंती क्रमही बदलता येतील.

पाच डिसेंबरला जाहीर होणार दुसरी यादी५ डिसेंबर सकाळी ११.३० वाजता अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, दुसऱ्या नियमित फेरीचे कट ऑफ संकेतस्थळावर पाहता येतील.  ९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना यादीप्रमाणे महाविद्यालयात प्रवेश निश्चिती करता येईल. याच दरम्यान महाविद्यालयांतील व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोटा प्रवेश सुरू राहणार आहेत. संकेतस्थळावर झालेले प्रवेश नोंदविण्यास कनिष्ठ महाविद्यालयांना अतिरिक्त वेळ दिला जाईल. १० डिसेंबरला तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल.

टॅग्स :महाविद्यालयदहावी