अकरावी प्रवेशप्रक्रिया टप्पा २: १४ हजारांहून विद्यार्थ्यांनी नोंदविला पसंतीक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 01:25 AM2020-08-13T01:25:43+5:302020-08-13T01:25:58+5:30

आयसीएसई आणि सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी अर्जात गुण भरताना चुकीचे गुण भरल्याने त्यांना त्यांचे अर्ज त्यांच्या लॉगिनमध्ये पार्ट पाठविण्यात आले आहेत.

Eleventh Admission Process Phase 2: Preference order reported by over 14,000 students | अकरावी प्रवेशप्रक्रिया टप्पा २: १४ हजारांहून विद्यार्थ्यांनी नोंदविला पसंतीक्रम

अकरावी प्रवेशप्रक्रिया टप्पा २: १४ हजारांहून विद्यार्थ्यांनी नोंदविला पसंतीक्रम

Next

मुंबई : अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याला बुधवारी सुरुवात झाली असून बुधवारी सायंकाळी ७ पर्यंत १४ हजार २२४ विद्यार्थ्यांनी आपले पसंतीक्रम नोंदविले होते. अकरावी प्रवेश अर्ज भरताना सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांचा श्रेणीचे गुणांत रूपांतर करताना किती विषयांचे गुण भरायचे हा घोळ कायम असल्याचे समोर आले आहे.

आयसीएसई आणि सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी अर्जात गुण भरताना चुकीचे गुण भरल्याने त्यांना त्यांचे अर्ज त्यांच्या लॉगिनमध्ये पार्ट पाठविण्यात आले आहेत.
अशा विद्यार्थ्यांनी योग्य पद्धती वापरून आणि मार्गदर्शन घेऊन गुण भरावेत, कागदपत्रांची पडताळणी करावीच आणि अर्ज लॉक करण्याच्या सूचना शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत.

सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना याबाबत मोबाइलवर संदेश पाठवला असल्याचे कळवले असले तरी ज्यांना संदेश मिळणार नाहीत किंवा जे मोबाइल बघणार नाहीत त्यांना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागेल ते निश्चित सांगता येणार नसल्याच्या समस्या अनेक पालकांनी मांडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने पूर्वानुभवी शिक्षकांना त्वरित आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत सामावून घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी केली आहे. त्यावर शासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़

महाविद्यालयातूनही नाराजी
शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाबाबत कनिष्ठ महाविद्यालयांकडून नाराजी पसरली आहे. कोट्यातील प्रवेश पूर्ण करण्यासाठी केवळ आठ दिवसांचा पूर्ण वेळ कालावधी दिला असल्याने प्रवेश पूर्ण करणार कसे, असा सवाल महाविद्यालयांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

अर्ज नोंदणी केलेले
विद्यार्थी - २५५८९६
अर्ज लॉक केलेले
विद्यार्थी - २०९३५८
अर्ज पडताळणी झालेले
विद्यार्थी - २०३०९५
पसंतीक्रम भरलेले
विद्यार्थी - १४२२४
अकरावीसाठी मुंबई विभागातील उपलब्ध जागा - ३२०१२०

Web Title: Eleventh Admission Process Phase 2: Preference order reported by over 14,000 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.