Join us  

अकरावी प्रवेश प्रक्रिया : प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 5:53 AM

गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांचे तीन गट, दोन फेऱ्या होणार

मुंबई : विशेष फेरीनंतरही अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थी प्रवेशाविना राहिल्याने ‘प्रथम येणाºयास प्राधान्य’ या तत्त्वानुसार आॅनलाइन प्रवेश फेरीचा निर्णय केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने घेतला आहे. या प्रक्रियेत गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांचे तीन गट केले आहेत. प्रत्येक गटात दिलेल्या मुदतीत प्रवेशाचा पर्याय प्रथम निवडणाºया विद्यार्थ्याला महाविद्यालयातील रिक्त जागांनुसार प्रथम प्रवेश देण्यात येईल. अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठीच ही फेरी असून प्रवेश प्रक्रिया २५ आॅगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे.अकरावीच्या खास फेरीमध्ये ४८ हजार ५६७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यापैकी ३७ हजार ५६७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. अद्यापही ९००० विद्यार्थी प्रवेशाविना आहेत. त्यामुळेच विशेष फेरीत प्रवेश न घेतलेल्या आणि कोणतेही महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी २५ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या काळात ‘प्रथम येणाºयास प्राधान्य’ याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. यासाठी विद्यार्थ्यांचे तीन गटांत विभाजन केले आहे. गट क्रमांक १ मध्ये ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी, गट क्रमांक २ मध्ये ६० टक्क्यांहून अधिक गुण तर गट क्रमांक ३ मध्ये ३५ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. दरम्यान, प्रक्रियेमध्ये एकाच वेळी अनेक विद्यार्थी लॉग इन करणे, एकाच महाविद्यालयासाठी एका वेळी अनेक विद्यार्थी प्रयत्नात असणे यामुळे तांत्रिक गोंधळ निर्माण होऊ शकतो ‘जागा उपलब्ध नाही’ असा संदेश आल्यानंतर विद्यार्थ्यांना नवीन महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.अशी असेल प्रवेश प्रक्रियाफेरी सुरू होण्यापूर्वी महाविद्यालयातील उर्वरित जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार गट क्रमांक १च्या विद्यार्थ्यांनी २५ आॅगस्ट रोजी संकेतस्थळावर लॉग इन करून हव्या असलेल्या आणि रिक्त जागा असलेल्या महाविद्यालयाची निवड करायची आहे.महाविद्यालयाची निवड केल्यानंतर त्यासमोरील ‘अप्लाय नाऊ’ या नावाची कळ दाबून प्रवेशनिश्चित करायचा आहे. प्रवेशाची संगणकीकृत पावती स्क्रीनवर दिसल्यानंतरच विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होईल.ही संगणकीकृत पावती घेऊनच विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. याचप्रकारे उर्वरित दोन्ही गटांची प्रवेश प्रक्रिया दिलेल्या मुदतीत होईल.वेळापत्रक :-२५ आॅगस्ट (सकाळी ११ वाजता) - रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध.२७ आॅगस्ट (सकाळी १० ते ५) - गट क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेश निश्चित करणे.२७ आणि २८ आॅगस्ट (सकाळी ११ ते ३) - विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे.२८ आॅगस्ट (सायंकाळी ६ वाजता) - पहिल्या फेरीनंतरच्या रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध.२९ आॅगस्ट (सकाळी १० ते ५ ) - गट क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेश निश्चित करणे.२९ आणि ३० आॅगस्ट (सकाळी १० ते ३) - विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे.३० आॅगस्ट (सायंकाळी ६ वाजता) - दुसºया फेरीनंतरच्या रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध.३१ आॅगस्ट (सकाळी १० ते ५) - गट क्रमांक ३ मधील विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेश निश्चित करणे.३१ आॅगस्ट आणि १ सप्टेंबर (सकाळी १० ते ३) - विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे.२ सप्टेंबर (सकाळी ११ वाजता) - प्रथम येणाºयास प्राधान्य फेरी - २ साठी रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध.

टॅग्स :विद्यार्थीमहाविद्यालयशिक्षण