अकरावी प्रवेश; पुढील आठवड्यात कॉलेज नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 05:27 IST2018-04-14T05:27:35+5:302018-04-14T05:27:35+5:30
राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा नुकतीच संपली. त्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचीही अॅडमिशनसाठीची लगबग सुरू झाली आहे.

अकरावी प्रवेश; पुढील आठवड्यात कॉलेज नोंदणी
मुंबई : राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा नुकतीच संपली. त्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचीही अॅडमिशनसाठीची लगबग सुरू झाली आहे. अकरावी आॅनलाइन प्रवेशांसाठी महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया पुढच्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती मुंबई उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या तयारीसाठी बैठका सुरू असून, लवकरच महाविद्यालयांच्या आॅनलाइन नोंदणी संबंधांतील पत्र जारी करण्यात येणार आहे.