अकरा तोळे सोन्यासह अट्टल गुन्हेगार जेरबंद

By Admin | Updated: December 31, 2014 22:43 IST2014-12-31T22:43:41+5:302014-12-31T22:43:41+5:30

अकरा घरफोड्यांमधील एका अट्टल गुन्हेगारास अकरा तोळे सोन्यासह जेरबंद करण्यास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना यश आले आहे.

Eleven Tola Golda with Atal Criminal Jirband | अकरा तोळे सोन्यासह अट्टल गुन्हेगार जेरबंद

अकरा तोळे सोन्यासह अट्टल गुन्हेगार जेरबंद

पालघर : पालघर उपविभागीय पोलीस स्टेशनअंतर्गत मासवण येथील दरोड्यातील तीन आरोपींना अटक करण्याबरोबरच परिसरातील अकरा घरफोड्यांमधील एका अट्टल गुन्हेगारास अकरा तोळे सोन्यासह जेरबंद करण्यास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना यश आले आहे.
पालघर तालुक्यात चार-पाच महिन्यापासून चेन स्रॅचींग, घरफोड्या अशा गुन्ह्यांत वाढ झाली होती. मनोर पो. स्टे. अंतर्गत मासवण येथील एका बंगल्यात पाळत ठेवून पालघरमधील वंकास पाडा येथील बाबू डफकले, अनिल राजपूत आणि सचिन गिरासे या आरोपींनी संगनमताने पहारेकऱ्याला बांधून ठेवीत घरातील एलईडी टीव्ही, रोख रक्कम, जुनी नाणी असा लाखोंचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणाचा तपास सफाळा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी लावला. तर नवली फाटकाजवळून बाजारहाट करण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील १ लाख २५ हजाराचे मंगळसूत्र खेचून पळणाऱ्या विकी उर्फ श्रवण कुमार राऊत, त्याचा साथीदार अमीत उरणकर याला पोलिसांनी अटक केली तर हे चोरलेले मंगळसूत्र मनोरच्या एका ज्वेलर्सला विकण्याचा प्रयत्न करणारी कमला पवार ही महिला फरार झाली आहे. पालघर शहरात सतत होणाऱ्या घरफोडीने त्रस्त पोलिसांनी बनावट देणगीपुस्तकाद्वारे फ्लॅटमधून देणगी वसूली करणाऱ्या पुण्या पन्नालाल मारवाडी रा. विरार (चंदनसार) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपण दहा घरफोड्या केल्याचे मान्य करीत गुजरातमधील आनंद येथील एका ज्वेलर्सकडे जमा केलेले अकरा तोळे सोने पोलीसांच्या स्वाधीन केले. चोरीच्या वाढत्या प्रकारानंतर पालघर पोलिसांनी नागरीकांच्या समन्वयाने जनजागृती सुरू केली असून रात्रीच्या गस्त वाढविण्याने चोरीच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. (वार्ताहर)

 

Web Title: Eleven Tola Golda with Atal Criminal Jirband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.