मुंबईत अकरा कोरोना रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:25 IST2020-12-12T04:25:21+5:302020-12-12T04:25:21+5:30

मुंबई : मुंबईत शुक्रवारी ११ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ११ पैकी ९ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यामधील ११ रुग्ण ...

Eleven corona patients die in Mumbai | मुंबईत अकरा कोरोना रुग्णांचा मृत्यू

मुंबईत अकरा कोरोना रुग्णांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत शुक्रवारी ११ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ११ पैकी ९ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यामधील ११ रुग्ण पुरुष होते. ७ जणांचे वय ६० वर्षांवर होते. ४ रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यानचे होते. शुक्रवारी ६५४ जणांना कोरोनाची बाधा झाली. ३११ रुग्ण बरे झाले. तर आता एकूण रुग्णांचा आकडा २ लाख ८९ हजार ३४३ झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांचा आकडा २ लाख ६ हजार २८२ आहे. सक्रिय रुग्ण १२ हजार २७४ आहेत. एकूण मृत रुग्णांची संख्या १० हजार ९५९ आहे. मुंबईतील रुग्ण बरा होण्याचा दर ९२ टक्के आहे. एकूण कोविड वाढीचा दर ०.२३ टक्के आहे. आतापर्यंत २० लाख ६१ हजार ९४ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर ३०५ दिवस झाला आहे.

Web Title: Eleven corona patients die in Mumbai