Join us

वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 09:25 IST

वाढीव वीज दराबाबत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सचिव जाविद मोमीन म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योगांसाठी विजेचा दर वाढणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नवीन ‘मल्टी-इयर टॅरिफ ऑर्डर’मुळे राज्यातील उच्चदाब, लघुदाब उद्योगांसमोर संकट उभे राहिले आहे. या आदेशामुळे प्रति युनिट वीज १ ते १.३० रुपयांनी महाग होणार आहे. त्यामुळे अनेक उद्योग बंद पडण्याची भीती आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका यंत्रमाग उद्योगाला बसणार असल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने सांगितले.

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

वाढीव वीज दराबाबत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सचिव जाविद मोमीन म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योगांसाठी विजेचा दर वाढणार आहे. इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव, सांगली, विटा, माधवनगर, वडगाव, ठाणे, वाडा, वसई, पालघर, सोलापूर, सांगोला, रुई यांसारख्या प्रमुख यंत्रमाग पट्ट्यांतील उद्योगांना या दरवाढीचा त्वरित आणि थेट परिणाम जाणवेल.

आत्मनिर्भर होणाऱ्या उद्योगांना बसणार फटका

सरकारच्या आवाहनानुसार सौरऊर्जा प्रणाली बसवून आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करणाऱ्या उद्योगांनाही या निर्णयामुळे फटका बसणार आहे. यंत्रमागधारकांना या दरवाढीमुळे वाढीव शुल्क द्यावे लागले. त्यामुळे त्यांचा आर्थिक भार आणखी वाढेल.

यात मागणी शुल्क, ऊर्जा शुल्क, वहन आकार, वेळेनुसार दरातील बदल, युनिट आणि केव्हीएएच आधारित बिलिंग आणि पॉवर फॅक्टर प्रोत्साहन यांसारख्या बाबींचा समावेश आहे, असेही जाविद मोमीन यांनी सांगितले.

टॅग्स :वीज