वीजग्राहकांना दुरुस्तीचा भरुदड

By Admin | Updated: November 27, 2014 00:33 IST2014-11-27T00:33:00+5:302014-11-27T00:33:00+5:30

पनवेल शहर हे नावाला भारनियमनमुक्त असले तरी सतत वीजपुरवठा खंडीत होणो हे नित्याचेच झाले आहे.

Electricity repairs | वीजग्राहकांना दुरुस्तीचा भरुदड

वीजग्राहकांना दुरुस्तीचा भरुदड

पनवेल : पनवेल शहर हे नावाला भारनियमनमुक्त असले तरी सतत वीजपुरवठा खंडीत होणो हे नित्याचेच झाले आहे. मंगळवारी तर मेंटेनन्सच्या नावाखाली कधीही वीजपुरवठा बंद केला जातो.शिवाय जाहीर केलेल्या वेळेत वीजपुरवठा सुरळीतही होत नसल्याने सर्वसामान्य ग्राहकांना त्रस सहन करावा लागत आहे.
वीजवितरण व्यवस्था अतिशय जुनाट झाली आहे. ओव्हर हेड वायरींमुळे वीजपुरवठा खंडीत होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक पोल जुनाट आणि गंजलेले आहेत. त्याचबरोबर रोहित्रची स्थिती फारशी चांगली नाहीच. त्याचबरोबर वीजवाहिन्यांची क्षमताही कमी पडू लागली आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडीत होतो. 
वीज वाहिन्यांमध्ये बिघाड, कधी वायर जळाली, कधी फिडरमध्ये प्रॉब्लेम अशी कारणो वीजवितरणकडून ग्राहकांना देण्यात येतात. मंगळवार हा महावितरणचा मेंटेनन्सचा वार असला तरी अनेकदा याबाबत सूचना दिल्या जातात मात्र प्रत्यक्षात वीज पुरवठा कधीही खंडीत केला जातो. त्यामुळे ग्राहकांनी कामे खोळंबतात. शहरातील काही भागात तर चार तासांचा शटडाऊन हा पाच ते सहा तासांवर जातो. मंगळवारी पनवेल बाजार परिसरात 3 ते 5 असा शटडाऊन घोषीत करण्यात आला होता. मात्र 11 ते दिड या कालावधीत त्या परिसरातील वीज बंद ठेवण्यात आलीच. त्याचबरोबर दुपारी 2.45 ते पाच ही शटडाऊन घेण्यात आले. 
या विभागात मोठमोठी दुकाने, उपहारगृहे, व्यापारी संकुले आहेत. याबाबत व्यावसायिक निलेश पाटील सांगतात, आम्ही वेळेवर वीजबिल भरतो. नियमित वीज मिळणो हा आमचा अधिकार आहे. दुरुस्तीची काम नियमित झाल्यास ग्राहकांना त्रस होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 
आठवडय़ातून एकदा यंत्रणोची दुरुस्ती करणो क्रमप्राप्त आहे. आम्ही मंगळवारी शटडाऊन घेतो. तोही आलटून पालटून म्हणजे एकाच वेळी सर्व ठिकाणी वीज बंद ठेवण्यात येत नाही. नियोजित वेळेत वीजपुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रय} असतो, असे उपकार्यकारी अभियंता एस. चंद्रमोळी यांनी दिली.
 
च्मंगळवार हा महावितरणचा मेंटेनन्सचा वार असला तरी अनेकदा याबाबत सूचना दिल्या जातात मात्र प्रत्यक्षात वीज पुरवठा कधीही खंडीत केला जातो. त्यामुळे ग्राहकांनी कामे खोळंबतात. शहरातील काही भागात तर चार तासांचा शटडाऊन हा पाच ते सहा तासांवर जातो. 
च्गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या वेळात वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहे. याबाबत महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधला असता, अनेकदा फोन उचलल्या जात नाही. फोन उचलला गेलाच तर फिडरमध्ये बिघाड, वायर तुटल्याची उत्तरे वारंवार दिली जातात. 

 

Web Title: Electricity repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.