कामगार कल्याण मंडळाच्या घोडपदेव केंद्रात वीज समस्या

By Admin | Updated: July 20, 2015 00:34 IST2015-07-20T00:34:54+5:302015-07-20T00:34:54+5:30

हॅलो फोटोसह - खेडेकर यांनी फोटो काढले आहेत.

Electricity problem in the Ghodepdev Center of Kamgar Kalyan Mandal | कामगार कल्याण मंडळाच्या घोडपदेव केंद्रात वीज समस्या

कामगार कल्याण मंडळाच्या घोडपदेव केंद्रात वीज समस्या

लो फोटोसह - खेडेकर यांनी फोटो काढले आहेत.
फोटो मेल करत आहे.

कामगार कल्याण मंडळाच्या घोडपदेव केंद्रात वीज समस्या
मुंबई : धोकादायक परिस्थितीत असलेल्या कामगार कामगार कल्याण मंडळाच्या घोडपदेव केंद्राची दुरूस्ती नुकतीच पूर्ण झाली. मात्र संपूर्ण दुरूस्ती करणार्‍या मंडळाला केंद्रात पुरेसी वीज व्यवस्था करता आली नसल्याची नाराजी सभासद व्यक्त करत आहेत.
केंद्रातील अपुर्‍या वीज व्यवस्थेमुळे केंद्र लवकर बंद केले जात असल्याची तक्रार अजय लांडे या स्थानिक नागरिकाने व्यक्त केली. लांडे म्हणाले, विभागातील लहान मुलांपासून तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मनोरंजनासाठी केंद्रात येतात. वर्तमानपत्र वाचणे, बुद्धिबळ व कॅरम खेळणे अशी अनेक मनोरंजनाची साधने याठिकाणी उपलब्ध आहेत. मात्र केंद्राची डागडुजी केल्यानंतर पूर्वी असलेली ट्युबलाईट लावण्यात आली नाही. त्याऐवजी ६० व्होल्टचे बल्ब लावण्यात आले आहेत. त्यामुळे वर्तमानपत्र वाचण्यातही अडचणी येत आहेत.
याबाबत संबंधित अधिकार्‍याला विचारणा केली असता, वीज वाहिन्यांचा (वायरिंग) खर्च निविदेत मंजूर झाल्याचे कळाले. मात्र ट्युबलाईट खरेदी करण्यास प्रस्ताव पाठवला असून तो मंजूर झाल्यानंतरच ट्युबलाईट लावण्यात येतील, असे सांगण्यात आले. मात्र त्यासाठी थोडा विलंब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
...............
स्थानिकांचा मदतीचा हात
लाखभर रुपये खर्च करून डागडुजी केलेल्या केंद्राला शेकडो रुपयांच्या ट्युबलाईटअभावी अंधारात ठेवण्यात येत आहे. यावर स्थानिक सभासदांनी मिळून केंद्राला ट्यूबलाईट आणि इतर साहित्य भेट देण्याचा निर्णय घेतल्याचे अजय लांडे यांनी सांगितले.
...................

Web Title: Electricity problem in the Ghodepdev Center of Kamgar Kalyan Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.