महापालिकेकडून विजेची उधळपट्टी
By Admin | Updated: October 30, 2014 00:20 IST2014-10-30T00:20:34+5:302014-10-30T00:20:34+5:30
शहरात मागील काही दिवसांपासून पथदिवे सुरू व बंद करण्याची यंत्रणा कोलमडू लागली आहे. दिवसाही पथदिवे सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत.

महापालिकेकडून विजेची उधळपट्टी
नवी मुंबई : शहरात मागील काही दिवसांपासून पथदिवे सुरू व बंद करण्याची यंत्रणा कोलमडू लागली आहे. दिवसाही पथदिवे सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत. पालिकेची जीपीआरएस यंत्रणाही बंद पडली आहे. विजेच्या उधळपट्टीविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.
जागतिक काटकसर दिनानिमित्त देशभरात वीज, पाणी व इतर नैसर्गिक साधनसंपत्तीची उधळपट्टी केली जाऊ नये यासाठी जनजागृती सुरू आहे. परंतु नवी मुंबईमध्ये मात्र मागील काही महिन्यांपासून मोठय़ा प्रमाणात विजेची उधळपट्टी सुरू आहे. शहरात जवळपास 3क् हजार पथदिवे आहेत. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी विभागनिहाय ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. तीन वर्षापूर्वी पथदिवे चालू व बंद करण्यासाठी जीपीआरएस यंत्रणा बसविली होती. या यंत्रणोमुळे आपोआप ठरावीक वेळेत पथदिवे चालू व बंद होत होते. कुठे पथदिवे सुरू आहेत, कुठे बंद आहेत याची माहिती पालिकेच्या अधिका:यांना एसएमएसद्वारे प्राप्त होत होती. परंतु मागील वर्षभरापासून ही यंत्रणा बंद पडली आहे. यामुळे वेळेवर पथदिवे सुरू केले जात नाहीत व सकाळी वेळेत बंदही केले जात नाहीत.
शहरात दिवसाही पथदिवे सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे. बुधवारी सानपाडा परिसरामध्ये दिवसभर पथदिवे सुरू होते. अशीच स्थिती इतर ठिकाणी दिसत आहे.
दिघ्यापासून बेलापूर्पयत अनेक वेळा सूर्योदयानंतरही पथदिवे सुरू असल्याचे पाहून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे पालिकेकडून सर्रास वीजेची उधळपट्टी होत असून याला थांबवण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवणो आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते पालिकेच्या अधिका:यांना रोज कुठे पथदिवे सुरू आहेत याविषयी फोन करत आहेत. फोन आल्यानंतर अधिका:यांची दिवे बंद करण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सहाय्यक शहर अभियंता जी. व्ही. राव यांचेही यावर नियंत्रण राहिलेले नाही. त्यांच्याशी याविषयी संपर्क साधला असता मला याविषयी माहिती नाही, अधिका:यांना विचारून माहिती घेऊन योग्य उपाययोजना करतो असे स्पष्ट केले.
च्महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील पथदिवे दिवसाही सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. विजेची उधळपट्टी सुरू आहे. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे सायन - पनवेल महामार्गावर अंधार पसरला आहे. रुंदीकरणानंतर या मार्गावर बटरफ्लाय पद्धतीचे विजेचे खांब लावले आहेत. परंतु सदर पथदिवे बंदच आहेत.
च्सानपाडा उड्डाणपूल व इतर ठिकाणी अंधार असल्यामुळे अपघात होऊ लागले आहेत. नागरिकांनी मागणी करूनही या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. महामार्गावरील अंधार कधी दूर होणार असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
बचतीत दडलाय प्रगतीचा मार्ग
जागतिक काटकसर दिनानिमित्त देशभरात वीज, पाणी व इतर नैसर्गिक साधनसंपत्तीची उधळपट्टी केली जाऊ नये यासाठी जनजागृती सुरू आहे. नैसर्गिक साधन संपत्तीची होणारी उधळपट्टी थांबवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने साधन सामुग्रीचा वापर करणो गरजेचे आहे. पाणी, वीज, इंधनाचा अवास्तव वापर कमी करण्यासाठी प्रयत्न करणो आवश्यक आहे.