वीज कामगारानेच केला बिलाच्या रकमेत अपहार
By Admin | Updated: September 26, 2014 01:40 IST2014-09-26T01:40:34+5:302014-09-26T01:40:34+5:30
जमा झालेल्या वीज बिलाच्या रकमेचा अपहार करून ग्राहक व वीज वितरणची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

वीज कामगारानेच केला बिलाच्या रकमेत अपहार
नवी मुंबई : जमा झालेल्या वीज बिलाच्या रकमेचा अपहार करून ग्राहक व वीज वितरणची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यासंदर्भात वीज वितरणच्या कामगाराविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीबीडी येथील वीज वितरणच्या कार्यालयात हा प्रकार घडला आहे. ग्राहकांकडून विज बिलाची रक्कम स्वीकारणाऱ्या कामगारानेच हा अपहार केला आहे. ग्राहकांकडून भरणा होणाऱ्या बिलाची रक्कम हा कामगार स्वीकारायचा. मात्र ग्राहकाला बिल स्वीकारल्याची कॉम्प्युटर प्रिंट न देता तो बिलावर
स्टँप मारुन देत होता. अभिलाष सावंत (२५) असे या कामगाराचे नाव आहे.
त्याने जानेवारी ते जून २०१४ दरम्यान २ लाख ५७ हजार रुपयांचा अपहार केला आहे. ही रक्कम वीज वितरण कंपनीकडे जमा न करता त्याने स्वत:च्या फायद्यासाठी वापरली आहे. मात्र हा प्रकार उघड होताच वीज वितरण कंपनीने त्याच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)