Join us  

स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांनी आरेतील नवसाच्या पाड्याला मिळणार वीज!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 1:07 PM

स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतर आरेच्या नवसाच्या पाड्याला अखेर वीज मिळणार आहे. मुंबई पशुवैदकीय महाविद्यालयाचे प्रभारी मालमत्ता अधिकारी यांनी नवसाच्या पाड्याला विद्युत व जल जोडणी देण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले.

ठळक मुद्देस्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतर आरेच्या नवसाच्या पाड्याला अखेर वीज मिळणार आहे.मुंबई पशुवैदकीय महाविद्यालयाचे प्रभारी मालमत्ता अधिकारी यांनी नवसाच्या पाड्याला विद्युत व जल जोडणी देण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले.दिवासी पाड्यांना वीज मिळावी म्हणून या संस्थेने सुरू केलेल्या सह्यांच्या मोहिमेला सोशल मीडियावर नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतर आरेच्या नवसाच्या पाड्याला अखेर वीज मिळणार आहे. मुंबई पशुवैदकीय महाविद्यालयाचे प्रभारी मालमत्ता अधिकारी यांनी 3 जून रोजी सकाळी नवसाच्या पाड्याला विद्युत व जल जोडणी देण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यावेळी येथील 80 आदिवासी बांधवांनी बँड वाजून जल्लोष केला. आता लवकरच वीज व जलजोडणीचे काम सुरू होणार असल्याची माहिती येथील आदिवासी बांधवांनी लोकमतशी बोलताना दिली. 

लोकमतने आरेचे आदिवासी पांडे अंधारात असे वृत्त दि. 4 व 6 जानेवारी रोजी आणि यापूर्वी अनेकवेळा दिले होते. लोकमतच्या वृत्ताची दखल अखेर मुंबई पशुवैदकीय महाविद्यालयाला घ्यावी लागली अशी माहिती नवसाचा आदिवासी पाड्याला वीज व पाणी जोडणी मिळावी म्हणून आदिवासींसाठी काम करणाऱ्या डब्ल्यूडब्ल्यूएच या अशासकीय सेवाभावी संस्थेच्या कॅसेन्ड्रा नाझरथ यांनी दिली. येथील आदिवासी पाड्यांना वीज मिळावी म्हणून या संस्थेने सुरू केलेल्या सह्यांच्या मोहिमेला सोशल मीडियावर नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता अशी माहिती त्यांनी दिली.

जर मेट्रो कार शेड कडे शासनाचे लक्ष केंद्रित आहे, तर मग  नवसाचा पाड्याकडे शासनाचे मात्र दुर्लक्ष होत होते. गेल्या मंगळवारी येथील आदिवासी बांधवांच्या विविध मागण्या मार्गी लागण्यासाठी आम्ही मोर्चा काढला. आमच्या संस्थेचे अथक प्रयत्न आणि मोर्चाचा परिणाम सकारात्मक होऊन अखेर नवसाच्या आदिवासी पाड्याला वीज व जलजोडणी देण्याचे ना हरकत प्रमाणपत्र मुंबई पशुवैदकीय महाविद्यालयाने दिले अशी प्रतिक्रिया कॅसेन्ड्रा नाझरथ यांनी व्यक्त केली.

आज देशातील सर्व घरात वीज मिळणार असा ठाम दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असताना मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई नगरीतील गोरेगाव पूर्व येथील येथील नवसाचा पाडा या आदिवासी पाड्यांना वीज नसल्याने येथील आदिवासी बांधव गेली 100 वर्षे अंधारात आपले जीवन जगत आहेत. आज देशाच्या स्वातंत्र्याला 72 वर्ष झाल्यानंतर देखिल आमचा नवसाचा पाडा अंधारात होता. मुंबई व्हेटरनरी कॉलेजसाठी नवसाचा पाडा येथील जागा दिली, मात्र आजमितीस आम्हाला त्यांना वीज मिळाली नाही. या कॉलेजच्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट आहेत पण आमच्या नवसाचा पाडा येथील आदिवासीच्या घरात वीज नव्हती अशी खंत येथील राकेश शिगवण व लखमा दिवाल उंबरसाडे यांनी व्यक्त केली. 

80 आदिवासी बांधव गेल्या 100 वर्षापासून येथे राहात असून त्यांना पाण्यासाठी एकच नळ असून या नळाला आठवड्यातून फक्त एकदाच पाणी येते अशी येथील आदिवासी पाड्यांची दयनीय अवस्था त्यांनी विषद केली. जर मेट्रो कार शेड कडे शासनाचे लक्ष केंद्रित आहे. तर मग नवसाचा पाड्याकडे शासनाचे मात्र दुर्लक्ष आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. लोकमतने आमच्या आदिवासी पडायची दखल घेतली, आरे तील आदिवासी पांडे अंधारात असे वृत्त 4 जानेवारी तसेच 6 जानेवारी रोजी आणि यापूर्वी अनेकवेळा दिले होते.लोकमतच्या वृत्ताची दखल अखेर मुंबई पशुवैदकीय महाविद्यालयाला घ्यावी लागली अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

 

टॅग्स :वीजमुंबई