Join us  

२५ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 3:57 PM

Electricity for State : रात्रीच्या वेळेस कृषिपंपांना देण्यात येणाऱ्या वीजपुरवठयामध्ये अडचणी

मुंबई : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारुन निर्माण होणारी वीज कृषी वाहिनीद्वारे शेतकऱ्यांना दिवसा पुरविण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळेस कृषिपंपांना देण्यात येणाऱ्या वीजपुरवठयामध्ये येणाऱ्या अडचणी, शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन ही भूमिका घेण्यात आली आहे. राज्यातील किमान ५० वीज वाहिन्यावरील सुमारे २५ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याबद्दल निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार ही योजना सुरू करण्यात आली.राज्यातील कृषिपंपाच्या थकबाकीचा आकडा हा व्याज व दंडासहित सुमारे ४२ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. कृषीपंपाच्या थकबाकीसंबंधाने स्वतंत्र धोरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. तथापि सध्याची महावितरणची आर्थिक परिस्थिती बघता वरील योजनेची अंमलबजावणी करते वेळी त्या वीज वाहिन्यावरील किमान ८० टक्के कृषी ग्राहकांनी चालू वीजबिलांचा भरणा करणे अपेक्षित आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याकरिता उपकेंद्रातील वाहिन्यांवरील ग्राहकांनी चालू वीजबिल भरुन उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी शासकिय अथवा खाजगी जागा उपलब्ध करुन देण्याकरिता सहकार्य करावे. सद्यस्थितीत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या मान्यतेनुसार राज्यातील कृषिपांना दिवसा ८ तास व रात्री १० तास आठवडयात चक्राकार पध्दतीने तीन फेज वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

 

टॅग्स :वीजमहावितरणमहाराष्ट्रमुंबई