उल्हासनगरात विद्युत टॉवर कोसळले, सर्वत्र अंधाराचे साम्राज्य
By Admin | Updated: August 15, 2014 00:03 IST2014-08-14T20:49:04+5:302014-08-15T00:03:10+5:30
शहराला वीजपुरवठा करणारा उच्च दाब वाहिनीचा टॉवर कोसळल्याने मार्केट व मध्यवर्ती रुग्णालय परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

उल्हासनगरात विद्युत टॉवर कोसळले, सर्वत्र अंधाराचे साम्राज्य
उल्हासनगर - शहराला वीजपुरवठा करणारा उच्च दाब वाहिनीचा टॉवर कोसळल्याने मार्केट व मध्यवर्ती रुग्णालय परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता महेश अनचितमाने यांनी दिली.
उल्हासनगर साईबाबा मंदिर, ऑर्डनन्स फॅक्टरीजवळील उच्च दाबाच्या वाहिनीचा टॉवर सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कोसळला़ यानंतर, विभागाने टॉवर उभे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. मात्र, सतत पडणार्या पावसाचा व्यत्यय येत आहे. शहरातील मुख्य मार्केट परिसरासह मध्यवर्ती रुग्णालयात अंधार पसरल्याने शस्त्रक्रिया विभाग बंद ठेवण्याची वेळ आली असून अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू ठेवल्या आहेत.