विद्युत पोलला बसची धडक
By Admin | Updated: October 21, 2014 23:03 IST2014-10-21T23:03:01+5:302014-10-21T23:03:01+5:30
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कॅस्ट्रॉल कंपनीसमोर असलेल्या विद्युत पोलला बसची धडक बसल्याने वीज पोलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

विद्युत पोलला बसची धडक
मोहोपाडा/रसायनी : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कॅस्ट्रॉल कंपनीसमोर असलेल्या विद्युत पोलला बसची धडक बसल्याने वीज पोलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कैरे गावासह परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
एस. एच. केलकर बस (एमएच-0४, एफ के-२८३) ही एमआयडीसी पाताळगंगा परिसरात कॅस्ट्रॉल कंपनीसमोर आली असताना वाहनचालकाचा बसवरील ताबा सुटला. यावेळी बस रस्त्याशेजारील विद्युत पोलवर जाऊन धडकल्याने औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा दीड ते दोन तास खंडित झाला असल्याचे वीज मंडळाचे सहाय्यक अभियंता कमलाकर आंबाडे यांनी बोलताना सांगितले. अपघातात बस चालक व इतर दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर वीज मंडळाच्या तीन विद्युत पोलचे नुकसान झाले असून वीज पुरवठा खंडित झाल्याने कारखानदारांचेही नुकसान झाले आहे. (वार्ताहर)