मुंबई : आखाती देशातील युद्धामुळे गॅस सिलिंडरसाठी रांगा लगताना दिसत आहेत. ‘एलपीजी’ला पर्याय म्हणून इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ‘इंडक्शन’च्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. परिणामी त्यांच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांची वाढही झाली आहे. मात्र, महाग असूनही त्या दुकानात मिळेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहक त्यांचे बुकिंग करून ठेवत असल्याची माहिती इलेक्ट्रिक उपकरणांचे विक्रेते देत आहेत.
गेल्या पाच दिवसांत स्वयंपाकासाठीच्या विद्युत उपकरणांच्या विक्रीत २०० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती बाजारपेठेतील विक्रेत्यांनी दिली. स्थानिक दुकानांमध्येही इलेक्ट्रिक उपकरणांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आहे. नामांकित कंपन्यांचा स्टॉकही संपला असून, नवीन आलेला नाही तरी बुकिंग होत असल्याची माहिती दुकानदार देत आहेत. सुरुवातीला नामांकित कंपन्यांना प्रतिसाद मिळत असला तरी आता छोट्या कंपन्यांच्या उत्पादनांचीही मागणी वाढली आहे.
इतर उपकरणांची खरेदीही वाढली : इलेक्ट्रिक कुकर, मल्टी-कुकर, इलेक्ट्रिक केटल आणि रोटी मेकर यांसारख्या उपकरणांकडेही नागरिकांचा कल वाढू लागला आहे. घरगुती वापराबरोबरच छोट्या खानावळी, घरगुती पातळीवर डबे देण्याचा व्यवसाय करणाऱ्यांची भिस्तही आता विद्युत उपकरणांवर आहे. मोठ्या हॉटेल्समध्येही विद्युत शेगड्या खरेदी केल्या जात आहेत.
आठ हजार रुपये किंमत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही इंडक्शन शेगड्या ‘आउट ऑफ स्टॉक’ दिसत आहे. या आधीही दोन ते चार हजारांपर्यंत मिळणारी इंडक्शन शेगडी चार ते आठ हजारांपर्यंत उपलब्ध होत आहे. काही नामांकित कंपन्या तर याहून महागात वस्तू विक्री करत आहेत.
‘इंडक्शन’ची मागणी वाढली आहे, मात्र आमच्याकडेच शेगड्या उपलब्ध नाहीत. कंपनीकडून पुरवठा होत नाही तोपर्यंत, ग्राहकांना उपलब्ध करून देऊ शकत नाही. राजहंस राठोड, व्यावसायिक, चारकोप
गॅसटंचाईमुळे इंडक्शन शेगडी विकत घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, दुकानांमधील स्टॉक संपला आहे. साक्षी तांबे, मालाड
दोन हजारांचे ‘इंडक्शन’ साडेतीन हजारांना मिळाले. सध्या ‘इंडक्शन’चा वापर करून गॅसचा कमीत कमी वापर करणार आहे. दीपिका साळुंखे, दहिसर
Web Summary : Electric stove demand surges amid gas shortage, emptying stores. Prices rise 15-20%, with induction cooktops selling for ₹4,000-₹8,000. Electric cookers and roti makers also gain popularity.
Web Summary : गैस की कमी के बीच इलेक्ट्रिक स्टोव की मांग बढ़ी, दुकानें खाली। कीमतों में 15-20% की वृद्धि, इंडक्शन कुकटॉप ₹4,000-₹8,000 में बिक रहे हैं। इलेक्ट्रिक कुकर और रोटी मेकर भी लोकप्रिय हो रहे हैं।