म्हाडात निवडणुकीचे वारे

By Admin | Updated: August 22, 2015 01:14 IST2015-08-22T01:14:30+5:302015-08-22T01:14:30+5:30

महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड एम्प्लॉइज को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने म्हाडा मुख्यालयात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत

Elections in the MHADA | म्हाडात निवडणुकीचे वारे

म्हाडात निवडणुकीचे वारे

मुंबई : महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड एम्प्लॉइज को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने म्हाडा मुख्यालयात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीत उतरलेल्या दोन प्रमुख पॅनलमध्ये जोरदार बॅनरयुद्ध सुरू असून अधिकाऱ्यांसह कर्मचारीही प्रचारात व्यस्त झाले आहेत.
सोसायटीच्या कार्यकारिणीची पंचवार्षिक निवडणूक २८ आॅगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात म्हाडातील दोन पॅनलमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे. सहयोग पॅनल, मैत्री पॅनल यांनी प्रत्येकी ११ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर पाच अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रत्येक पॅनलमधील उमेदवार प्रत्येक विभागांमध्ये जाऊन आपला प्रचार करत आहे. कामातून वेळ काढून उमेदवार प्रचाराला लागल्याने म्हाडाच्या कामावरही परिणाम होऊ लागला आहे. शनिवार आणि रविवार म्हाडा कार्यालय बंद असल्याने उमेदवारांनी शासकीय कर्मचारी वसाहतीमध्ये राहणाऱ्या म्हाडा कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचारासाठी अवघे चार दिवस हाती असल्याने प्रचार शिगेला पोहोचणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Elections in the MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.