कर्जत, पेणमध्ये 23 नोव्हेंबरला निवडणूक
By Admin | Updated: October 28, 2014 22:48 IST2014-10-28T22:42:01+5:302014-10-28T22:48:48+5:30
कर्जत तालुक्यातील डिसेंबर 2क्14 मध्ये मुदत संपत असलेल्या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका 23 नोव्हेंबर रोजी होणार आहेत.

कर्जत, पेणमध्ये 23 नोव्हेंबरला निवडणूक
कर्जत : कर्जत तालुक्यातील डिसेंबर 2क्14 मध्ये मुदत संपत असलेल्या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका 23 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने त्यासाठीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्हय़ातील मोठय़ा असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीसह तिवरे, वाकस, उमरोली आणि वरईतर्फेनीड अशा पाच ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.
निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीची अधिसूचना देखील निघाली आहे. पाच ग्रामपंचायत मधील 59 सदस्य निवडीसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यात नेरळ-17, उमरोली-13, वाकस- 11, तिवरे- 9,आणि वरईतर्फे नीड - 9 असे सदस्य निवडण्यासाठी 23 नोव्हेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी विधानसभा आणि त्यापूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या आहेत, त्यामुळे ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्ष सरसावलेले दिसत आहेत. त्यात नेरळची निवडणूक अनेक दृष्टीने महत्त्वाची आहे. नेरळवर सर्व राजकीय पक्षांची नजर असल्याने येथील निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत. जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार 3 नोव्हेंबरपासून 8 नोव्हेंबर्पयत नामांकन अर्ज भरण्यासाठी मुदत आहे. तर 1क् नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या अर्जांची छाननी केली जाणार असून छाननीमध्ये मंजूर झालेल्या अर्ज मागे घेण्यासाठी 12 नोव्हेंबर दुपारी तीन र्पयत वेळ देण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार 23 नोव्हेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे, तर 24 नोव्हेंबर रोजी सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी कर्जत तहसील कार्यालयात होईल अशी माहिती कर्जत तहसील कार्यालयाकडून मिळाली आहे.
दोन तालुक्यांत निवडणूक
अलिबाग : रायगड जिल्हय़ातील पेण व कजर्त तालुक्यांतील एकूण सहा ग्रामपंचायतींकरिता येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतदान होवून 24 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने दिली आहे. सहा ग्रामपंचायतींमध्ये पेण तालुक्यातील शेडाशी तर कजर्त तालुक्यातील नेरळ, उमरोली, तिवरे, वाकस व वरई तर्फे निडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.