भिवंडी तालुक्यात १० ग्रा.पं.च्या निवडणुका
By Admin | Updated: April 5, 2015 22:45 IST2015-04-05T22:45:05+5:302015-04-05T22:45:05+5:30
भिवंडी तालुक्यातील काल्हेर सरवली, खांडपे-चिंचवली, सुरई-सारंग, तळवली-आर्जुली, झिडके, अस्नोली, लाखीवली, नांदकर-सांगे, खंबाळे

भिवंडी तालुक्यात १० ग्रा.पं.च्या निवडणुका
लोनाड : भिवंडी तालुक्यातील काल्हेर सरवली, खांडपे-चिंचवली, सुरई-सारंग, तळवली-आर्जुली, झिडके, अस्नोली, लाखीवली, नांदकर-सांगे, खंबाळे या दहा ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक कार्यकाल मे ते आॅगस्ट महिन्या दरम्यान संपन्न असल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने भिवंडीच्या तहसिलदार वैशाली लंभाते यांनी निवडणुक कार्यक्रम घोषित केला आहे.
निवडणुकीची नोटीस ३० मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून निवडणूक प्रक्रीयेसाठी ३१ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान सार्वजनिक
सुट्टीचे दिवस वगळून नामनिर्देशान पत्राचे वितरण व स्वीकार केला जाणार आहे.
८ एप्रिल ला छाननी तर १० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज
मागे घेता येणार आहे. १० एप्रिल रोजीच दुपार नंतर अंतिमरित्या निवडणूक चिन्हाचे वाटप करून उमेदवारी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २२ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे.