Join us

द. मुंबईतून ठाकरे गटाची निवडणूक तयारी, ६ जानेवारीला गिरगावात आदित्य ठाकरेंची सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 14:02 IST

गिरगावात ६ जानेवारी रोजी त्यांच्या प्रचाराची पहिली सभा आ. आदित्य ठाकरे घेणार आहेत.

मुंबई : महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम झाले नसले तरी ठाकरे गटाने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघापासून आपल्या लोकसभा प्रचाराची सुरुवात करण्याचे ठरवले आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे.  गिरगावात ६ जानेवारी रोजी त्यांच्या प्रचाराची पहिली सभा आ. आदित्य ठाकरे घेणार आहेत.

दक्षिण मुंबई मतदारसंघात खासदार अरविंद सावंत निवडून आले आहेत. दोन्ही लोकसभा निवडणुकींत भाजप-शिवसेना युती होती. त्याचा फायदा अरविंद सावंत यांना झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत या ठिकाणी भाजपकडून उमेदवार दिला जाणार असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नाव चर्चेत आहे.  

टॅग्स :आदित्य ठाकरेराजकारणनिवडणूक