भिवंडी ग्रामीणमध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज

By Admin | Updated: October 7, 2014 23:48 IST2014-10-07T23:48:35+5:302014-10-07T23:48:35+5:30

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून येथे २२५१ कर्मचाऱ्यांची निवडणूकीसाठी नियुक्ती झाली आहे

Election machinery ready in Bhiwandi rural | भिवंडी ग्रामीणमध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज

भिवंडी ग्रामीणमध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज

वाडा: भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून येथे २२५१ कर्मचाऱ्यांची निवडणूकीसाठी नियुक्ती झाली आहे.
भिवंडी ग्रामीण मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक डॉ. राकेश गुप्ता यांनीही नुकताच या मतदारसंघाच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या दृष्टीने पोलीस दलाने आवश्यक नियोजन करावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच आदर्श आचारसंहितेचे कोठेही उल्लंघन होणार नाही, याबाबत सर्वांनीच दक्ष राहण्याचे आवाहन गुप्ता यांनी केले.

Web Title: Election machinery ready in Bhiwandi rural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.