निवडणूक कार्यालयात पाण्याची बोंब ....ईस्टर्नसाठी
By Admin | Updated: August 25, 2014 22:33 IST2014-08-25T22:33:52+5:302014-08-25T22:33:52+5:30
(फोटो मेलवर आहेत....ईस्टर्नसाठी)

निवडणूक कार्यालयात पाण्याची बोंब ....ईस्टर्नसाठी
(फ ोटो मेलवर आहेत....ईस्टर्नसाठी)निवडणूक कार्यालयात पाण्याची बोंब महापालिकेने कापले पाणी कनेक्शनमहिला-पुरुष कर्मचार्यांची पाण्यासाठी वणवणमनीषा म्हात्रे / मुलुंड: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक कार्यालयातील कर्मचारी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकताना दिसत असल्याचे धक्कादायक चित्र मुलुंड १५५ विधानसभा मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात पाहावयास मिळत आहे. यामध्ये महिला कर्मचार्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुलुंड पूर्वेकडील मुलुंड विधानसभेच्या १५५ या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात दिवसाला शेकडो मतदार नावनोंदणीसाठी येतात. तसेच लाखोंची लोकसंख्या असलेल्या मुलुंडकरांची या कार्यालयाकडे धाव असते. त्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांच्या येण्यात भरच पडते. सध्या १०० हून अधिक कर्मचारी येथे काम करीत आहेत. त्यात ४० टक्के महिला कर्मचारीवर्ग आहे. असे असतांना गेल्या १५ दिवसांपासून निवडणूक कार्यालयातील पाणी कनेक्शन कापल्यामुळे येथील कर्मचारी वर्गाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना बिस्लेरीचा आधार घ्यावा लागत आहे. शौचालायातही गैरसोय होत असल्याने जवळच्या आयटीआयकडे विनवणी करण्याखेरीज या कर्मचार्यांकडे अन्य कोणताही पर्याय शिल्लक नाही. सकाळी १० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत कर्मचारी वर्गाला कार्यालयातच ताटकळत बसावे लागते. संबधित अधिकारी मात्र कर्मचार्यांसाठी पाण्याचे टँकर पाठविण्याचा दावा करत आहेत. दुसरीकडे कर्मचारी वर्गाकडे अशी कुठलीच सुविधा पोहचत नसल्याचे कर्मचार्यांचे म्हणणे आहे. त्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्मचारी वर्गाच्या संख्येत आणखी भर पडणार असताना कर्मचार्यांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.पालिकेच्या या इमारतीत पहिल्या मजल्यावर २००९ मध्ये सुरु झालेल्या या कार्यालयाला मात्र २००४ पासून पूर्ण इमारतीचे थकीत ७ लाख रु पयांचे पाणी बिल आले आहे. सध्या त्याची थकीत रक्कम ९ लाखांपर्यंत पोहोचली आहे. मुळात याच इमारतीत पालिका मार्केट विभागाचे कार्यालय देखील आहे. अन्य खाजगी कार्यालये असताना पालिका प्रशासनाने निवडणूक कार्यालयाच्या माथी हे सारे बिल मारले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन आणि निवडणूक विभाग यांच्यातील वादाचा फटका नाहक कर्मचारी वर्गाला बसतोय. ।.......................वरिष्ठ पातळीवर पाण्याच्या थकीत बिल प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु असून येत्या आठवड्यात हा प्रश्न सुटेल.ज्योती वाघ, तहसीलदार, मुलुंड..............वारंवार मुदत देवूनही दोन वर्षांपासूनचे पाणीबिल थकवल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. बिल भरल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.चंदा जाधव, सहाय्यक आयुक्त, मुलुंड टी विभाग