निवडणूक बहिष्कार : आज सर्वपक्षीय बैठक

By Admin | Updated: January 16, 2015 23:02 IST2015-01-16T23:02:28+5:302015-01-16T23:02:28+5:30

ठाणे जिल्हापरिषदेच्या २८ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या सर्वपक्षीय निर्णयानंतर पालघर जिल्ह्यातील जिल्हापरिषद

Election boycott: today's all-party meeting | निवडणूक बहिष्कार : आज सर्वपक्षीय बैठक

निवडणूक बहिष्कार : आज सर्वपक्षीय बैठक

पालघर : ठाणे जिल्हापरिषदेच्या २८ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या सर्वपक्षीय निर्णयानंतर पालघर जिल्ह्यातील जिल्हापरिषद निवडणुकीवर यासंदर्भात उद्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक ३ वा. मनोर सायलेन्ट रीसॉर्टमध्ये होणार आहे असे शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांनी लोकमतला सांगितले.
ठाणे जिल्हापरिषद निवडणुकीवर जसा बहिष्कार घातला गेला तसेच पालघर जिल्ह्यातही व्हावे त्याला सर्वपक्षाची साथ मिळेल अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. याला राष्ट्रवादीचे आ. आनंद ठाकूर यांनीही दुजोरा दिला आहे. आपण या बाबतीत पालकमंत्री तसेच खा. अ‍ॅड. वणगा यांच्याशी चर्चा केल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. तसा निर्णय झाल्यास काँग्रेस, बहुजन विकास आघाडीने अनुकूलता दर्शविल्याचे आ. ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. खा. वणगा यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनीही या निवडणुका पुढे ढकलणे संयुक्तीक ठरेल असे पत्रकारांना सांगितले. पालकमंत्र्यांनी उद्याच याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवावी यासाठी आपण पालकमंत्र्यांशी चर्चा करीत असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्र्यांशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
ठाण्याप्रमाणे पालघरातही पालघर, बोईसर, सातपाटी, मनोर, सफाळे, तसेच इतर तालुक्यातील अनेक मोठ्या शहर, गावांत नगरपंचायती व नगरपरिषदेच्या स्थापनेचा प्रस्ताव अनेक वर्षापासून विचाराधीन आहे. अशा परिस्थितीत नगरपंचायती व नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर होऊ घातलेल्या निवडणुका निरर्थक ठरू शकतात. इतकेच नव्हे तर शासनासह उमेदवारांचा खर्च वाया जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर नगरपंचायती व नगरपालिकेचा निर्णय होईपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी आहे, असे घडून आल्यास ती एक ऐतिहासिक घटना ठरेल. जिपच्या पहिल्याच निवडणुकीवर बहिष्कार ही बाबही प्रथमच घडेल.
(वार्ताहर)

Web Title: Election boycott: today's all-party meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.