Join us  

'2019 ची निवडणूक भाजपासाठी नसून भारतासाठी', मुख्यमंत्र्यांनी रणशिंग फुंकले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 7:59 PM

आगामी 2019 ची निवडणूक माझ्यासाठी वेगळी आहे, कारण हा येणारा कालखंड भारत घडवणार आहे. 2020 साली जगातील सर्वात तरुण देश भारत असणार आहे.

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजापाच्या कार्यक्रमातून आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. कार्यकर्त्यांना संबोधित करताना, आगामी निवडणूक भाजापासाठी नसून भारतासाठी आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. 2019 ची निवडणूक ही मोठी संधी आहे. भारताचं भविष्य आणि भवितव्य ठरविण्याची ही निवडणूक असल्याचंही फडणवीस यांनी म्हटले. 

आगामी 2019 ची निवडणूक माझ्यासाठी वेगळी आहे, कारण हा येणारा कालखंड भारत घडवणार आहे. 2020 साली जगातील सर्वात तरुण देश भारत असणार आहे. 2020 साली जपानचं सरासरी वय 48 असेल, ईस्टर्न युरोपचं 44 असेल, वेस्टर्न युरोपचं 41 असेल, चीनचं 39 असेल, अमेरिकेचं 37 वर्षे असेल. त्यावेळी भारतचं सरासरी वय 27 वर्षे असणार आहे. तारुण्यानं मुसमुसेला हा भारत मानव संसाधन म्हणून उपयोगात आणला पाहिजे. जगाच्या पाठीवर अशा प्रकारचा डेमोक्रॅटीक अॅडव्हान्टेज युरोपला मिळाला, त्यावेळी त्यांची प्रगती झाली. चीनला मिळाला तेव्हा चीनची प्रगती झाली. त्यामुळे एबीजी अब्दुल कलामसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण 2020 मध्ये ही उडाण घेऊ शकतो. 2020 ते 2035 पर्यंतचा काळ भारतासाठी 'करो या मरो' असा असणार आहे. 

2019 ची निवडणूक मी निवडणूक म्हणून पाहात नाही. समजा, 2019 ला खिचडी सरकार आलं तर देशाची अवस्था काय होईल, असे म्हणत फडणवीस यांनी महाआघाडीला लक्ष्य केलं. तसेच, डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारवर टीका करताना डॉ. मनमोहनसिंग यांना कुठलेही स्वातंत्र्य नव्हते, असेच फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतील कार्यक्रमातून फडणवीस यांनी आगामी निवडणुकांमध्ये मोदी सरकारला निवडणूक देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केलं.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसलोकसभा निवडणूक २०१९भाजपा