Join us
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध पेन्शनरला लुबाडले; बोरीवली पश्चिमेच्या महाराष्ट्रनगर परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 11:09 IST

याप्रकरणी त्यांनी बोरीवली पोलिसात धाव घेतली आणि  भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला.

मुंबई : बोरीवली पश्चिमेच्या महाराष्ट्रनगर परिसरात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम सेंटरमध्ये तक्रारदार शरद भोकरे (६९) हे २९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पैसे काढायला गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या ४० वर्षीय व्यक्तीने पैसे का निघत नाहीत, असे म्हणत भोकरे यांचे एटीएम कार्ड काढून घेतले. त्यानंतर स्वतः त्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न करत त्यांना बोलण्यात गुंतविले. पैसे निघत नसल्याने भोकरे घरी गेल्यावर खात्यातून ६० हजार काढण्यात आले. तेव्हा त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करत पासवर्ड चोरून पैसे काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी बोरीवली पोलिसात धाव घेतली आणि  भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :चोरीमुंबई