Join us  

एकनाथ खडसे आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 5:17 AM

ईडीने खडसे यांना ३० डिसेंबरला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजाविले. मात्र, त्यांना कोरोनासदृश आजाराची लागण झाली. त्यामुळे त्यांना १४ दिवसांनंतर चौकशीस बाेलावण्याचा निर्णय घेतला होता

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भोसरी येथील भूखंड खरेदीतील कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना शुक्रवारी चौकशीस कार्यालयात हजर राहण्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजाविले आहे. 

ईडीने खडसे यांना ३० डिसेंबरला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजाविले. मात्र, त्यांना कोरोनासदृश आजाराची लागण झाली. त्यामुळे त्यांना १४ दिवसांनंतर चौकशीस बाेलावण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना १५ जानेवारीला सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे समन्स बजाविले. त्यानुसार शुक्रवारी ते कार्यालयात हजर होतील, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :एकनाथ खडसेअंमलबजावणी संचालनालय