मुंबईतील आठ मॉल्सना नोटीस
By Admin | Updated: August 10, 2015 01:36 IST2015-08-10T01:36:36+5:302015-08-10T01:36:36+5:30
मुंबईसह उपनगरातील मॉल्सच्या पाहणी अंतर्गत बांधकामांसह आग प्रतिबंधक उपाययोजना न राबवल्याने वांद्रे येथील ८ मॉल्सना नोटिसा धाडण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलातर्फे देण्यात आली.

मुंबईतील आठ मॉल्सना नोटीस
मुंबई : मुंबईसह उपनगरातील मॉल्सच्या पाहणी अंतर्गत बांधकामांसह आग प्रतिबंधक उपाययोजना न राबवल्याने वांद्रे येथील ८ मॉल्सना नोटिसा धाडण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलातर्फे देण्यात आली.
यात वांद्रे येथील लिंक स्क्वेअर मॉल, खार येथील लिंक स्क्वेअर मॉल, खार येथील क्रिस्टल मॉल, खारमधील श्रीजी प्लाझा, वांद्रे येथील न्यू ब्यूटी सेंटर, वांद्रे येथील केनली वर्थ मॉल, सांताक्रुझमधील हायलाइफ मॉल आणि रिलायन्स हायपर मॉल यांचा समावेश आहे.
वांद्र्यातील केनिलवर्थ शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीनंतर आयुक्त अजय मेहता यांनी यासंदर्भात पाहणी करण्याचे आदेश दिले होते.