उत्तन-चौक मार्गावर एसटीच्या आठ फे:या
By Admin | Updated: November 10, 2014 22:39 IST2014-11-10T22:39:04+5:302014-11-10T22:39:04+5:30
स्थानिक परिवहन सेवेची सुरुवात झाल्यानंतर एसटीने येथील उत्तन-चौक मार्गावरील सध्याची एक फेरी सोडून सर्व फे:या बंद केल्या होत्या.

उत्तन-चौक मार्गावर एसटीच्या आठ फे:या
राजू काळे - भाईंदर
स्थानिक परिवहन सेवेची सुरुवात झाल्यानंतर एसटीने येथील उत्तन-चौक मार्गावरील सध्याची एक फेरी सोडून सर्व फे:या बंद केल्या होत्या. मात्र, येथील प्रवासी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे त्या पुन्हा सुरू होणार असल्याने पालिकेच्या परिवहन सेवेच्या उत्पन्नावर मात्र गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
2क्क्5 मध्ये एसटीने होत असलेल्या तोटय़ावर पर्याय म्हणून सर्व महापालिका हद्दीतील सेवा बंद करून तेथे स्थानिक परिवहन सेवा सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. त्यानुसार, मीरा-भाईंदर पालिकेने 2क्क्5 मध्ये कंत्रटी पद्धतीवरील परिवहन सेवा सुरू केली. यानंतर, एसटीने भाईंदर ते चौकदरम्यानची एकमेव फेरी वगळता सर्व फे:या बंद केल्या. सध्या सुरू असलेली एसटीची एकमेव फेरी रोज सकाळी 8 वाजता जाते. त्यानंतर येथील प्रवाशांची मदार केवळ स्थानिक परिवहन सेवेवर असते. परंतु, स्थानिक परिवहन सेवा डळमळीत झाली आहे. त्यातच ही एसटी सेवा तुरळक असल्याने प्रवाशांना ही सेवा गैरसोयीची ठरत आहे.
शिवाय, या सेवेचे प्रवासी भाडे एसटीपेक्षा 3 ते 7 रुपयांनी जास्त असल्याने प्रवाशांना जास्त भाडे मोजावे लागत आहे. प्रवाशांना ये-जा करण्यासाठी भाईंदर शहर सोयीचे तर दुस:या बाजूला बोरिवली येथील गोराई खाडीमार्गे मुंबईला जाणो उत्तनकरांना खर्चीक व वेळखाऊ ठरत असल्याने स्थानिक परिवहन सेवाच महत्त्वाची ठरत आहे. परंतु, या सेवेतील बसची स्थिती अत्यंत दयनीय झाल्याने त्या सतत वाटेतच नादुरुस्त होत असून प्रवाशांना त्याचा त्रस सहन करावा लागत आहे. यावर त्रस्त झालेल्या भाईंदर, मनोरी, उत्तन, पाली, चौक प्रवासी संघटनेने गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे भाईंदर-चौक मार्गावर एसटी सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्याची दखल महामंडळाने घेत सध्या सुरू असलेल्या भाईंदर-चौक मार्गावरील एकमेव एसटी फेरीत आणखी 8 फे:यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात सकाळच्या सुमारास 5 व सायंकाळी 4 अशा एकूण 9 फे:या तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात येणार आहेत.
सध्या हा मार्ग फायदेशीर ठरत असल्याने तेथे एसटी सुरू झाल्यास स्थानिक परिवहन सेवेच्या उत्पन्नावर गंडांतर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत, भाईंदर एसटी स्थानकाचे वाहतूक नियंत्रक जी.व्ही. बडगुजर यांनी सांगितले की, वरिष्ठांकडून अद्याप लेखी आदेश प्राप्त झाले नसून आदेश मिळताच उपलब्ध गाडय़ांनुसार संबंधित ठिकाणी सेवा सुरू करण्यात येईल.