Join us
Daily Top 2Weekly Top 5

एसटीमध्ये राज्यात आठ कर्मचाऱ्यांचा मृत्यू, एकूण कोरोना रुग्ण 315

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 21:05 IST

राज्यातील ३१५ कोरोना रुग्णांपैकी १६५ कर्मचारी उपचार घेऊन बरे झाले आहेत.

मुंबई : एसटीच्या राज्यभरातील विविध विभागात शुक्रवारपर्यंत ३१५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी ८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.ठाणे आणि मुंबई मध्यवर्ती कार्यालयातील प्रत्येकी दोन, मुंबई, अकोला, जळगाव आणि बुलढाणा विभागातील प्रत्येकी एक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील ३१५ कोरोना रुग्णांपैकी १६५ कर्मचारी उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर, १४२ कर्मचाऱ्यांवर उपचार घेऊन बरे झाले आहेत. ठाणे विभागात सर्वाधिक १२७ कर्मचारी बाधीत यापैकी  ३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, ८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबई विभागात १०३ जण बाधित यापैकी २९ कर्मचारी बरे झाले आहेत. तर, ७३ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु असल्याची माहिती एसटी महामंडळ प्रशासनाकडून सांगितले आली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याबसचालक