मुंबई - महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या (एमएमसी) नऊ जागांसाठीच्या निवडणुकीत अधिकृत आयएमए पॅनल विरुद्ध एमएमसी आयएमए पॅनल यांच्यात अटीतटीची लढत झाली. यामध्ये एमएमसी आयएमए पॅनलचे आठ उमेदवार तर अधिकृत आयएमए पॅनलचा एक उमेदवार विजयी झाला. यंदाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे त्याची जोरदार चर्चा झाली. मतमोजणी बुधवारी सकाळी ८ वाजता सुरु झाली होती.
‘आता प्रवास संघर्षमय’निवडणुकीसंदर्भात एक डॉक्टर म्हणाले, की यावेळची निवडणूक वेगळी होती. कारण पहिल्यांदाच आयएमए संघटनेत उभी फूट पडल्याचे चित्र दिसून आले होते. या विषयाची डॉक्टरवर्गात मोठी चर्चा होती. मात्र डॉक्टरांना माहिती असते कुणाला मतदान करायचे ते या निवडणुकीत दिसून आले. मात्र या पुढचा कौन्सिल स्थापन करण्याचा प्रवास नक्कीच संघर्षमय असणार आहे.
हे विजयी -
डॉ. संतोष कदम, डॉ. संजय कदम, डॉ. नीलेश निकम, डॉ. संजय देशपांडे, डॉ. सुनील इंगळे, डॉ. अनिलकुमार पाटील, डॉ. मंगेश गुलवडे, डॉ. उज्ज्वला कराड, डॉ. अनिल पाचनेकर
संघटनेत सदस्य कोण ?मेडिकल कौन्सिल, अधिनियम, १९६५ नुसार प्रचलित पद्धतीनुसार ९ सदस्य हे नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांद्वारे निवडणुकीने निवडले जातात. दोन सदस्य हे पदसिद्ध स्वरूपात असतात. दोन सदस्य संस्था / विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडले जातात. पाच सदस्य राज्य शासनाद्वारे नामनिर्देशित केले जातात.
Web Summary : MMC IMA panel secured victory in Maharashtra Medical Council elections. Eight MMC IMA and one official IMA candidate won. Political interference sparked debate. Council formation anticipated to be challenging.
Web Summary : महाराष्ट्र मेडिकल काउंसिल चुनाव में एमएमसी आईएमए पैनल विजयी रहा। आठ एमएमसी आईएमए और एक आधिकारिक आईएमए उम्मीदवार जीते। राजनीतिक हस्तक्षेप से बहस छिड़ी। परिषद गठन चुनौतीपूर्ण होने की आशंका है।