अंबरनाथ-बदलापूरमधील, आठ स्वीकृत नगरसेवक आज ठरणार
By Admin | Updated: May 24, 2015 22:59 IST2015-05-24T22:59:52+5:302015-05-24T22:59:52+5:30
येथील नगरपरिषदेच्या पाच स्वीकृत नगरसेवक पदासाठी सोमवारी दुपारी ३ वाजता निवड प्रक्रिया पार पडणार आहे. शिवसेनेला ३, भाजपाला १ आणि काँग्रेसच्या

अंबरनाथ-बदलापूरमधील, आठ स्वीकृत नगरसेवक आज ठरणार
अंबरनाथ : येथील नगरपरिषदेच्या पाच स्वीकृत नगरसेवक पदासाठी सोमवारी दुपारी ३ वाजता निवड प्रक्रिया पार पडणार आहे. शिवसेनेला ३, भाजपाला १ आणि काँग्रेसच्या वाट्याला एक नगरसेवकपद येणार आहे. काँग्रेसच्या कोट्यातील १ नगरसेवकपद शिवसेना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेत ५७ नगरसेवक असून या नगरसेवकांच्या पक्षनिहाय आणि गटानिहाय स्वीकृत नगरसेवकांची संख्या ठरणार आहे. ५७ नगरसेवकांमध्ये शिवसेनेच्या गटात २६ आणि ५ अपक्षांचे समर्थन घेत ३१ जणांचा गट आहे. तर भाजपाने एका अपक्षाला आपल्याकडे घेऊन ११ नगरसेवकांचा गट तयार केला आहे. काँग्रेसचे ८ नगरसेवक आहेत. या व्यतिरीक्त राष्ट्रवादीचे ५ आणि मनसेचे दोन अशी नगरसेवकांची संख्या आहे. त्यातही राष्ट्रवादीने शिवसेनेला समर्थनाचे पत्र दिल्याने शिवसेनेचा आकडा ३१ वरुन ३६ वर गेला आहे. अशात मनसेची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यानुसार शिवसेनेचे ३ स्वीकृत नगरसेवक, ११ संख्याबळावर भाजपाचा १ आणि आठ संख्या बळावर काँग्रेसचा एक सदस्य निवडला जाणार आहे. मात्र काँग्रेसच्या कोट्यातील एक नगरसेवकपद शिवसेना आपल्याकडे कसे वळविता येईल, यासाठी आकडेमोड करण्यात व्यस्त आहे. शिवसेनेच्या गोटातून माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी यांची वर्णी लागणे निश्चित मानले जात आहे. तसेच माजी नगराध्यक्ष विजय पवार, पद्माकर दिघे, संभाजी कळमकर आणि सुरेश जाधव या चौघांपैकी दोघांना संधी मिळणार आहे.