वेस्टर्नसाठी.....खान बंधूनी साकारला इजिप्तचा देखावा

By Admin | Updated: August 31, 2014 22:51 IST2014-08-31T22:51:13+5:302014-08-31T22:51:13+5:30

वेस्टर्नसाठी.....

For Egypt, the appearance of Egypt ... | वेस्टर्नसाठी.....खान बंधूनी साकारला इजिप्तचा देखावा

वेस्टर्नसाठी.....खान बंधूनी साकारला इजिप्तचा देखावा

स्टर्नसाठी.....
फोटो मेलवर आहेत....
...............................................................
वसार्ेव्यात खान बंधूनी साकारला इजिप्तचा देखावा

अंधेरी: सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्वप्नाक्षय मित्रमंडळाने यंदा इजिप्तच्या स्थापत्य शैली व वस्तुसंग्रहालयचा भव्य देखावा साकारला आहे. वसार्ेवा मेट्रो स्थानकजवळील मॉडेल टाऊन येथील या मंडळात आलेल्या गणेशभक्तांना इजिप्तला न जाता इजिप्तचे दर्शन या देखाव्यातून होत आहे.
सुमारे दीड महिना अथक परिश्रमातून मासूम अहमद खान आणि मेहफूज खान आणि त्यांच्या ५० कलाकरांनी हा अप्रतिम देखावा साकारला आहे. पालिकेचे विरोधीपक्ष नेते देवेंद ्र(बाळा)आंबेरकर हे या समितीचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. खान बंधूनी साकारलेला हा देखावा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून सध्या ओळखला जात आहे.
मंडळाने आजपर्यंत सामाजिक, समाज प्रबोधनात्मक, पर्यावरण रक्षण आणि धार्मिक एकात्मता अशा विविध विषयांवरील देखावे सादर करून अनेक पारितोषिके मिळवली आहेत. या मंडळाचे यंदा ३४ वे वर्ष असून सामाजिक बांधिलकी म्हणून मंडळातर्फे रक्तदान शिबिर,रुग्णवाहिका सेवा, गुणवंत विद्यार्थी सत्कार, वह्या वाटप या बरोबर येथील चाचा नेहरू उद्यानातील जाँगर्स पार्कचे व्यवस्थापन देखील मंडळाच्या वतीने केले जात असल्याची माहिती श्री.आंबेरकर यांनी दिली. समितीचे अध्यक्ष राजेश ढेरे, सचिव ताज मोहम्मद, दिनेश गवलानी, संजीव कल्ले (बिल्लू) आणि नंदकिशोर शर्मा हे कार्यकारिणी सदस्य या गणेशोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: For Egypt, the appearance of Egypt ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.