किमतीमुळे अडली म्हाडाच्या घरांची लॉटरी, गणपतीपूर्वी सोडतीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 03:11 AM2018-07-03T03:11:10+5:302018-07-03T03:11:22+5:30

घरांच्या किमती आवाक्यात नसल्याने टीकेचे लक्ष्य बनलेल्या म्हाडाच्या यंदाच्या घरांच्या किमती किती ठेवाव्यात, याबद्दल विविध मते व्यक्त केली जात असल्याने या महिन्यातील लॉटरी पुढे जाण्याची चिन्हे आहेत.

Efforts to draw the lottery, Ganapati before leaving the house | किमतीमुळे अडली म्हाडाच्या घरांची लॉटरी, गणपतीपूर्वी सोडतीचे प्रयत्न

किमतीमुळे अडली म्हाडाच्या घरांची लॉटरी, गणपतीपूर्वी सोडतीचे प्रयत्न

Next

- अजय परचुरे 

मुंबई : घरांच्या किमती आवाक्यात नसल्याने टीकेचे लक्ष्य बनलेल्या म्हाडाच्या यंदाच्या घरांच्या किमती किती ठेवाव्यात, याबद्दल विविध मते व्यक्त केली जात असल्याने या महिन्यातील लॉटरी पुढे जाण्याची चिन्हे आहेत. मात्र मुंबई मंडळात आधी एक हजार असलेली लॉटरीतील घरे वाढण्याची चिन्हे असल्याने घरांच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर, आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात म्हाडाकडून सोडत काढण्यात येणार होती. मात्र यात तांत्रिक अडचणी आल्या आहेत. मुंबईतील कोणत्या ठिकाणची घरे सोडतीत समाविष्ट करायची, याचा निर्णय झाला आहे. पण त्या घरांच्या किमतींवर खल सुरू आहे. उत्पन्नाची मर्यादा व त्यासाठीच्या घरांच्या किमती यांचे सूत्र जुळत नाही. त्या गटातील व्यक्तींनी गृहकर्ज घेतले तरी त्याचे हप्ते व घराच्या किमती हे सूत्रही जुळत नाही, हे यापूर्वीच्या सोडतीत स्पष्ट झाले होते. त्यामुळे म्हाडाची घरे बाजारभावापेक्षा स्वस्त असली, तरी ती त्या त्या उत्पन्न गटाच्या आवाक्यात नाहीत, असे तक्तेही प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे यंदाच्या घरांच्या किमती किती ठेवाव्यात. त्या उत्पन्न गटाला त्या किमतीनुसार गृहकर्ज मिळेल का, याच्या हिशेबाचे काम सुरू असल्याने ही सोडत काही दिवस लांबण्याची चिन्हे आहेत.

गणपतीपूर्वी सोडतीचे प्रयत्न
ठरल्याप्रमाणे जुलैच्या पहिल्या आठवड्यात म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची जाहिरात येणे कठीण आहे. पण लॉटरी फार पुढे ढकलल्यास गणपतीपूर्वी (सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात) सोडत काढण्यात अडचणी येतील. तेव्हा सोडत न निघाल्यास गणेशोत्सवात ती काढता येणार नाही व नंतर पितृपंधरवड्यामुळे नवरात्रापर्यंत पुढे जाईल. त्यामुळे १५ जुलैपर्यंत जाहिरात प्रसिद्ध करावी, असा निर्णय घेऊन अधिकारी कामाला लागले आहेत.

घरांसाठी म्हाडात फोनसत्र
म्हाडाच्या या सोडतीची माहिती तेथील अधिकाºयांच्या हवाल्याने ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिली होती. त्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळ कार्यालयात लॉटरीसंदर्भात मुंबईकरांचे वारंवार फोन येत आहेत. पुणे मंडळाची म्हाडाची लॉटरी शनिवारी पार पडल्याने मुंबईकरांची उत्कंठा वाढली आहे.

Web Title: Efforts to draw the lottery, Ganapati before leaving the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.