ईडी करणार आज एकनाथ खडसेंकडे चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:06 IST2021-07-08T04:06:35+5:302021-07-08T04:06:35+5:30

हजर समन्स जारी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भोसरीतील भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ...

ED will interrogate Eknath Khadse today | ईडी करणार आज एकनाथ खडसेंकडे चौकशी

ईडी करणार आज एकनाथ खडसेंकडे चौकशी

हजर समन्स जारी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भोसरीतील भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स बजावले आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांना कार्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

खडसे यांची ईडीने यापूर्वीही चौकशी केली आहे. मात्र जावई गिरीश चौधरी याला अटक केल्यानंतर तातडीने त्यांना पुन्हा पाचारण केल्याने त्यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, ईडीच्या कारवाईविरोधात खडसे यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात ईडीला सुनावणी सुरू असेपर्यंत त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.

----------------------

खडसे आज सीडी दाखविणार?

खडसे हे गुरुवारी सकाळी १० वाजता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते कोणती भूमिका जाहीर करतात? राष्ट्रवादीत प्रवेश करताना त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे ‘सीडी’ बाहेर काढतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: ED will interrogate Eknath Khadse today