व्हिडिओकॉनसंबंधित कार्यालयांंवर ईडीचे धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:07 IST2021-07-17T04:07:10+5:302021-07-17T04:07:10+5:30
मुंबई, औरंगाबादमध्ये ईडीची कारवाई व्हिडिओकॉनसंबंधित कार्यालयांंवर ईडीचे छापे मुंबई, औरंगाबादमध्ये ईडीची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : व्हिडिओकॉन या ...

व्हिडिओकॉनसंबंधित कार्यालयांंवर ईडीचे धाडसत्र
मुंबई, औरंगाबादमध्ये ईडीची कारवाई
व्हिडिओकॉनसंबंधित कार्यालयांंवर ईडीचे छापे
मुंबई, औरंगाबादमध्ये ईडीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : व्हिडिओकॉन या बड्या कंपनीशी संबंधित कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) छापे सुरू आहेत. शुक्रवारी ईडीने व्हिडिओकॉनच्या मुंबई, औरंगाबादसह विविध ठिकाणी धाडसत्र टाकत झाडाझडती सुरू केली आहे. व्हिडिओकॉनचे मालक राजकुमार धूत आणि वेणूगोपाल धूत यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईत गोवंडी आणि मलबार हिल भागात आयसीआयसीआय बँक कर्जप्रकरणी ही कारवाई करण्यात असल्याचे समजते. यावेळी ईडीने काही कागदपत्रे आणि दस्तावेज ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. मात्र, याबाबत ईडीकडून अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.
आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूहाला २०१२ मध्ये ३ हजार २५० कोटींचे कर्ज दिले होते. त्यानंतर व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणूगोपाल धूत आणि चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यात झालेले सर्व व्यवहार तपास यंत्रणांच्या रडारवर आले. ईडीने याप्रकरणी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे प्रमुख वेणूगोपाल यांच्यासह इतरांविरोधात काळ्या पैशांविरोधातील कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कारवाई सुरू ठेवली आहे. ईडीने चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली. पुढे दाखल केलेल्या आरोपपत्रातही या सर्वांच्या नावांचा समावेश आहे. याबाबत ईडीकडून अधिक तपास सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर हे छापेसत्र सुरू असल्याचे ईडी सूत्रांकडून समजते.