इकोरीचची चौकशी

By Admin | Updated: January 29, 2015 23:01 IST2015-01-29T23:01:20+5:302015-01-29T23:01:20+5:30

पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागात येणा-या गो-हे गाव येथे वैतरणाऐवजी तानसा नदी दाखवणाऱ्या प्रदूषण मंडळाचा लोकमतने पर्दाफाश करताच ती शोधण्यासाठी प्रदूषण मंडळाच्या अधिकारी

Echoinquestion | इकोरीचची चौकशी

इकोरीचची चौकशी

मनोर : पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागात येणा-या गो-हे गाव येथे वैतरणाऐवजी तानसा नदी दाखवणाऱ्या प्रदूषण मंडळाचा लोकमतने पर्दाफाश करताच ती शोधण्यासाठी प्रदूषण मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी इकोरीच कंपनीची चौकशी केली. तसेच आधीच्या अधिकाऱ्यांनी दिलेले प्रदूषण मंडळाचे दाखले आणि इतर कागदपत्रांची मागणी केली.
गोऱ्हे येथे इकोरीच कॉॅस्मेटीक इंडिया प्रा.लि. कंपनीचे काम सुरू आहे. या कंपनीला लागणारा दाखला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण येथील आधीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता दिला. या नाहरकत दाखल्यात गोऱ्हे गावाजवळून वाहणारी वैतरणा नदी गायब करण्यात आली असून त्याऐवजी तानसा नदीचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच ही नदी कंपनीपासून ७ किमीवर असे दाखवून ना हरकत दाखला चुकीचा दिल्याची बातमी लोकमतमध्ये २६ जाने. रोजी प्रसिद्ध होताच कल्याण येथील प्रदूषण मंडळाचे अधिकारी खडबडून जागे झाले.
लोणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोऱ्हे येथे येऊन इकोरीच कॉस्मेटीक कंपनीच्या व्यवस्थापकाला भेटून ना हरकत दाखला व इतर कागदपत्रांची मागणी केली. तसेच कंपनीच्या मालकाला कल्याण येथील प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचा आदेशही दिला आहे.
(वार्ताहर)

Web Title: Echoinquestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.