Join us  

पाणी साचलेल्या रुळावर लोकल चालविणे सुलभ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 6:21 AM

मोटरमनना सिम्युलेटर सिस्टिमद्वारे प्रशिक्षण : विरार कारशेडमधील सिस्टिममुळे पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा वाढणार

मुंबई : पाणी साचलेल्या रेल्वे रुळावर लोकल चालविणे अधिक सोईस्कर झाले आहे. मान्सूनमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर पाणी साचले होते, त्यावेळी मोटरमनने सिम्युलेटर सिस्टिमच्या प्रशिक्षणामुळे लोकल सुलभरीत्या चालविली होती. मोटरमनला सिम्युलेटर सीस्टमद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे. विरार कारशेडमध्ये सिम्युलेटर सीस्टम बसवून रेल्वे चालविण्याचे प्रात्यक्षिक अनुभव मोटरमनला दिले जात आहेत. यासह प्रशिक्षणामुळे पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा अधिक वाढणार याची प्रतिक्रिया पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

उपनगरीय लोकल चालविण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देणारी सिम्युलेटर सीस्टम फक्त विरार कारशेडमध्ये आहे. भारतीय रेल्वेमधील सर्वात प्रथम आणि एकमेव यंत्रणा विरार कारशेडमध्येच आहे. मान्सूनमध्ये भार्इंदर, विरार, वसई रोड या दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. या पाण्यातून मोटरमनने प्रभावीपणे लोकल चालविली. मोटरमनने सिम्युलेटरद्वारे प्रशिक्षण घेतल्याने लोकलचा खोळंबा कमी झाला. त्यामुळेच आता मोटरमनला लोकल चालविण्याचे प्रशिक्षण सिम्युलेटर दिले जाते. या प्रशिक्षणामुळे मोटरमनकडून प्रभावीपणे लोकल चालविली जाते, असा विश्वास पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.५ नोव्हेंबर रोजी पश्चिम रेल्वेला ६९ वर्षे पूर्ण झाली.या दिनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेमधील विरार कारशेडची पाहणी करण्यात आली. पश्चिम रेल्वेमध्ये मुंबई सेंट्रल, कांदिवली, विरार कारशेड असे तीन कारशेड आहेत. मुंबई सेंट्रल कारशेडची निर्मिती १९२८, कांदिवली कारशेडची निर्मिती १९८४ मध्ये झाली, तर विरार कारशेडची निर्मिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) प्रकल्पांतर्गत २०१२ मध्ये केली. विरार कारशेडमधील सिम्युलेटर सिस्टिम, लोकल वॉशिंग सेंटर, लोकलची दुरुस्ती केली जाते. विरार कारशेडमध्ये थ्री टायरचे निरीक्षण शेड आहे, भारतीय रेल्वेमधील अशा प्रकारचे प्रथमच शेड आहे.द्यावी लागते परीक्षासिम्युलेटर सिस्टिमचे प्रशिक्षण देताना मोटरमनला १ हजार गुणांचा पेपर द्यावा लागतो. यामधील५०० गुण सुरक्षा उपायांचे असतात. मोटरमनचे प्रसंगावधान, हॉर्न वाजविण्याची सतर्कता, सिग्नल यंत्रणेचे पालन, वेगमर्यादा, वक्तशीरपणा याची नोंद या प्रशिक्षणात घेतली जाते.पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज १२ डब्यांच्या १०८ लोकल, तर १५ डब्यांच्या ४ लोकल चालविण्यात येतात. या लोकलची दुरुस्ती करण्याचे काम मुंबई, कांदिवली आणि विरार कारशेडमध्ये केले जाते.

टॅग्स :लोकलपाऊस