ईस्टर्न.....दोन सारांश बातम्या..
By Admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:10+5:302014-11-21T22:38:10+5:30
ईस्टर्न.....दोन सारांश बातम्या..

ईस्टर्न.....दोन सारांश बातम्या..
ई ्टर्न.....दोन सारांश बातम्या.......................................घाटकोपरमध्ये रास्ता रोको घाटकोपर: पाथर्डी हत्याकांडाविरोधात घाटकोपर रमाबाई नगर येथील रहिवाशांनी घाटकोपर पूर्व द्रुतगती महामार्ग जाम केला होता. त्यामुळे परिसरात जवळपास १५ मिनिटे वाहतुककोंडी निर्माण झाली होती. सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी घटनेच्या निषेधार्थ टायरही जाळण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत २० जणांना ताब्यात घेतले होते....................................................वात्सल्य ट्रस्टमधील मुलांना फळवाटपकांजूर: येथील वात्सल्य ट्रस्टमधील अनाथ मुलांना आज फळवाटप करण्यात आले. आई वडिलांंचे छत्र हरपलेल्या या मुलांसमवेत दिवस घालवत नेत्याचा वाढदिवस साजरा करावा, या हेतूने या फळवाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक कैलास पाटील यांनी दिली. यावेळी तेथील मुलांंशी गप्पा मारत त्यांच्यासोबत विविध खेळ यावेळी खेळण्यात आले. त्यामुळे मुलांंच्या चेहर्यावरही एक वेगळाच आनंद दिसून आला...................................................