ईस्टर्न पानासाठी...सिंगल

By Admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:15+5:302014-11-21T22:38:15+5:30

ईस्टर्न पानासाठी...सिंगल

Eastern page ... Single | ईस्टर्न पानासाठी...सिंगल

ईस्टर्न पानासाठी...सिंगल

्टर्न पानासाठी...सिंगल
.....................................
नाहूरमध्ये वाहनाला आग
नाहूर: ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरुन जाताना एका टाटा इंडिका वाहनाने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. रात्री सव्वा नऊच्या सुमारास इंडिकाचालक ऐरोलीच्या दिशेने जात असताना गाडीतून धूर येत असल्याने त्याने वेळीच गाडी थांबवून बाहेर पळ काढला. काही क्षणातच गाडीने पेट घेतला. अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळावर पोहचेपर्यंत इंडिका जळून खाक झाली होती. हायवेवरही घटना घडल्यामुळे काही काळ परिसरात वाहतूककोंडी निर्माण झाली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी दिली. या घटनेमुळे काही वेळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: Eastern page ... Single

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.