ईस्टर्न....मुलुुंड एटीएम चोरी प्रकरण
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:37+5:302015-02-18T00:13:37+5:30
मुलुुंड एटीएम चोरी प्रकरण

ईस्टर्न....मुलुुंड एटीएम चोरी प्रकरण
म लुुंड एटीएम चोरी प्रकरणआरोपींचा अन्य घटनेतील सहभागाचा शोध मुलुंड : मुलुंडमधील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांंना पोलिसांनी अटक केली होती. या सराईत गुन्हेगार असलेल्या चौकडीचा अन्य कीती गुन्ह्यांंत सहभाग याची पोलीस कसून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या एका अल्पवयीन आरोपीसह जितू दिनेश शर्मा (२५), गोविंदकुमार उमाशंकर सोनी (३१), दिनकर चिंतामण घोडे उर्फ राज उर्फ चिम्मा (२०) हे सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहे. न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौकडीपैकी अल्पवयीन आरोपीसह शर्मा विरोधात चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांंची नोंद असल्याचे समोर आले. त्यातही सोनी आणि घोडे विरोधातही अनेक गुन्हे असल्याचा संशय मुलुंड पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी कुठे एटीएमचोरी, घरफोडींंच्या गुन्ह्यांत त्यांंचा सहभाग आहे का? यासाठी पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहे. चारही जण सराईत आरोपी असून मौजमजेसाठी अशा प्रकारच्या चोरी ते करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड कॉलनीतील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर या चौकडीचा बर्याच दिवसांपासून डोळा होता. त्यात यामागचा मुख्य सुत्रधार जितू शर्मा याने शनिवारी रात्री एटीएम चोरी करण्याचा कट रचला. त्या कटानुसार रविवारी पहाटे त्यांनी एटीएम चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन तास प्रयत्न करुनही एटीएममधील रक्कम चोरण्यात त्यांना यश आले नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चारही जण मुलुंड पोलिसांंच्या हाती लागले. गुन्ह्यात्र वापरलेले हॅमर मशीन आणि स्क्रू डायव्हर आरोपींकडून पोलिसांनी हस्तगत केले. (प्रतिनिधी)