ईस्टर्न.....कंत्राटदाराला धमकवल्याप्रकरणी एक गजाआड

By Admin | Updated: August 28, 2014 20:55 IST2014-08-28T20:55:34+5:302014-08-28T20:55:34+5:30

ईस्टर्नसाठी....

Eastern ..... a go-ahead for threatening the contractor | ईस्टर्न.....कंत्राटदाराला धमकवल्याप्रकरणी एक गजाआड

ईस्टर्न.....कंत्राटदाराला धमकवल्याप्रकरणी एक गजाआड

्टर्नसाठी....
कंत्राटदाराला धमकवल्याप्रकरणी एक गजाआड
विक्रोळी: येथे एका कंत्राटदाराला धमकावल्याप्रकरणी राजू दिलानी या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अजूनही काही जणांचा शोध सुरु आहे. श्रीराज शेख असे कंत्राटदाराचे नाव असून ते विक्रोळीला राहण्यास आहेत. बुधवारी सायंकाळी दिलानी आणि त्याच्या साथीदारांनी त्याला वाटेत अडवून २०११ साली बांधकामासंबंधी झालेल्या व्यवहारातील थकित पैशांची मागणी केली. यावेळी रिव्हाल्व्हरचा धाक दाखवून पैसे दिले नाहीत, तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शेख यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दिलानीला धमकी आणि भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत अटक केल्याची माहिती विक्रोळी पोलिसांनी दिली.

Web Title: Eastern ..... a go-ahead for threatening the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.