ईस्टर्न....चालकाची प्रकृती अद्यापही गंभीर
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:27+5:302015-01-23T23:06:27+5:30
बिबट्यामुळे झालेल्या अपघातातील

ईस्टर्न....चालकाची प्रकृती अद्यापही गंभीर
ब बट्यामुळे झालेल्या अपघातातीलचालकाची प्रकृती अद्यापही गंभीर मुलुंड : मुलुंडमध्ये इनोव्हा गाडी समोर बिबट्या आडवा येऊन झालेल्या अपघातात देवदूत चंदा या केमिकल इंजिनियर तरुणाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी होते. या अपघातातील चालकाची प्रकृती अजुनही गंभीर असून सायन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. भांडुप कॉम्प्लेक्स परिसरात पालिकेचा जलशुद्धिप्रकरण प्रकल्प आहे. याच प्रकल्पाचे काम डिग्री मोंटे कंपनीने हाती घेतले आहेत. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सात जणांसह जाणार्या इनोव्हासमोर बिबट्या आल्याने अपघात झाला. याप्रकरणी चालक दत्ताराम वरकविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र वरकची प्रकृति गंभीर असल्यामुळे त्याला अद्यापही अटक करण्यात आले नसल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली. तर यामध्ये जखमी झालेले चेतन तोंडलेकर, तुषार पवार, नितीन इंगळे, अनिल पवार आणि संतोष काठोरे मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाचही जणांंची प्रकृति स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)