ईस्टर्न....धडपड हक्काच्या व्यासपीठासाठी....
By Admin | Updated: November 1, 2014 21:48 IST2014-11-01T21:48:15+5:302014-11-01T21:48:15+5:30
ईस्टर्नसाठी...फोटोसह...फोटो मेलवर आहेत...

ईस्टर्न....धडपड हक्काच्या व्यासपीठासाठी....
ई ्टर्नसाठी...फोटोसह...फोटो मेलवर आहेत....................धडपड हक्काच्या व्यासपीठासाठी....भांडुपकर तरुणांंचा आगळावेगळा उपक्रममंुबई: छायाचित्रकारांना हक्काचे व्यासपीठ उपल्ब्ध करुन देण्यासाठी भांडुप फोटोग्राफर ग्रुपने पुढाकार घेतला आहे. व्यावसायिक फोटोग्राफरपासून हौशी फोटोग्राफरपर्यंत सर्वांनी त्यांंच्या कॅमेर्यात कैद केलेल्या निवडक छायाचित्रांंचे दोन दिवसीय भव्य प्रदर्शन भांडुपच्या पराग विद्यालयात भरविण्यात आले आहे.या प्रदर्शनात व्यावसायिक फोटोग्राफरसह हौशी कलाकारांंनी काढलेली छायाचित्रेही मांडण्यात आली आहेत. सुरुवातीला सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तरुण फोटोग्राफरचा हा ग्रुप छायाचित्रकारापर्यंत पोहोचला. पहिल्याच वर्षी त्यांच्या या संकल्पनेला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि मुंबई ठाणे आणि नवी मंुबईतील हजारो छायाचित्रकारांंचे फोटो त्यांच्यापर्यंत पोहोचल्याचे ग्रुपचे सचिव सतीश गावडे यांनी सांगितले. छायाचित्रकारांनी पाठविलेले निवडक ३५० फोटो या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत. अगदी पावसाच्या पाण्यात पानावर उभे राहणार्या दवबिंदूंपासून आकाशात कडाडणार्या वीजेचा थरार टिपलेली आकर्षक छायाचित्रे प्रदर्शनात आहेत. तर दुसरीकडे एकाच वेळी सहा चिमुकल्यांंच्या मुखांवर उमटणारे हास्य असो अथवा लग्नसराईत उभे राहून एखाद्या चिमुकलीचे टिपलेले भावनात्मक छायाचित्रेही लक्ष वेधून घेत आहेत. याव्यतिरिक्त गड किल्ले, सामाजिक वारसा जपणारे छायाचित्रेही प्रदर्शनात आहेत. दोन दिवसीय या प्रदर्शनाला बच्चेकंपनीपासून ज्येष्ठांची पसंती मिळत आहे. छायाचित्रकारांच्या कलेला एका व्यासपीठाखाली आणून त्यांंच्या कलेला वाव मिळावा, म्हणून हे प्रदर्शन भरविले असल्याचे दिनेश धुरे यांनी सांगितले. एरवी फक्त कॅमेरा आणि सोशल नेटवर्किंगपुरते मर्यादित असलेल्या कलेल्या या प्रदर्शनातून एक वेगळीच कौतुकाची थाप मिळत असलेल्याचे हौशी छायाचित्रकार धनश्री ढोकेने सांगितले. (प्रतिनिधी)