Join us  

पालिकेचे ‘अ‍ॅन अर्ली इंटरव्हेंशन सेंटर’ कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 6:36 AM

सामान्य मुलांप्रमाणे विशेष मुलांची काळजी घेण्यासाठी विशिष्ट व्यवस्थापनाची गरज असते. ही गरज ओळखून काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या मुलांना सेवा दिली जाते.

- स्नेहा मोरेमुंबई - सामान्य मुलांप्रमाणे विशेष मुलांची काळजी घेण्यासाठी विशिष्ट व्यवस्थापनाची गरज असते. ही गरज ओळखून काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या मुलांना सेवा दिली जाते. मात्र ही सेवा सशुल्क असते, सर्व घटकांतील नागरिकांना परवडत नाही. यावर उपाय शोधत मुंबई महानगरपालिकेने ‘अ‍ॅन अर्ली इंटरव्हेंशन सेंटर’ सुरू करण्याची घोषणा गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात केली होती. परंतु या घोषणेला वर्ष उलटूनही हे सेंटर कागदावरच असल्याचे उघडकीस आले आहे.नायर रुग्णालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली नागपाडा बेलासिस मार्गावर ‘अ‍ॅन अर्ली इंटरव्हेंशन सेंटर’ सुरू होणार आहे. त्याकरिता मागील वर्षी महापालिका प्रशासनाने १ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली होती. घोषणेला वर्ष उलटूनही पालिकेच्या २०१९-२० च्या अर्थसंकल्पात सेंटर सुरू करण्यात येत असल्याचे नमूद आहे. परंतु या सेंटरचे केवळ स्थळ निश्चित झाले असून प्रत्यक्षात सेवेत येण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागेल, अशी माहिती नायर रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे सलग दोन अर्थसंकल्पांत पालिकेनेयाविषयी घोषणा करून त्याची पूर्तता केली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.नागपाडा येथील बेलासिस मार्गावरील पालिकेच्या एका इमारतीत हे सेंटर सुरू करण्यात येणार आहे. विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता व त्यांची सर्वंकष काळजी घेण्यासाठी या सेंटरची मदत होईल. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जन्मजात व्यंग, वाढ खुंटणे, कमतरता, रोग या अनुषंगाने तपासणी केलेल्या बालकांना गरज आणि आवश्यकतेनुसार पाठविण्यात येईल.निविदा प्रक्रिया सुरूनागपाडा येथील पालिकेचा दवाखाना असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या, तिसºया व चौथ्या मजल्यावर हे सेंटर तयार होणार आहे. या सेंटरच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू होईल. या सेंटरमध्ये कोणकोणत्या विभागांचा समावेश करायचा याविषयी नुकताच अंतिम निर्णय झाला. मात्र या इमारतीची पूर्ण ओसी मिळाली नसून त्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र सेंटरसाठी लागणारे मनुष्यबळ , अत्याधुनिक उपकरणे यासाठी आणखी कालावधी जाणार आहे. हे सेंटर प्रत्यक्ष सेवेत येण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.- डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्र