Join us  

वाईन शॉप समोरील रांगा टाळण्यासाठी इ टोकन पध्दतीने मद्यविक्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 2:04 PM

उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर जावून ग्राहकाला आपला पत्ता,  माहिती व मोबाइल क्रमांक नोंदवावा लागेल.

मुंबई: मद्यखरेदीसाठी मद्याच्या दुकानासमोर होणारी गर्दी टाळण्यासाठी व कोरोनापासून बचाव होण्यासाठी आता मद्यप्रेमींसाठी इ टोकन पध्दतीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याद्वारे संकेतस्थळावर जावून ग्राहकाला आपला पत्ता,  माहिती व मोबाइल क्रमांक नोंदवावा लागेल. त्यानंतर त्या परिसरातील जवळच्या वाईन शॉपची यादी त्यांना दिसेल त्यापैकी ज्या दुकानातून त्यांना मद्य घ्यायचे आहे त्या दुकानाची उपलब्ध असलेली वेळ निवडावी लागेल व त्या नमूद वेळी जावून वाईन शॉपमधून मद्यविक्री करता येईल. 

 मद्यविक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर वाईन शॉप समोर मोठ्या प्रमाणात रांगा लागू लागल्याने या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी विशेष आदेश काढून मुंबईतील मद्यविक्रीवर बंदी घातली. सध्या राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री सुरु आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री बंद आहे. ज्या ठिकाणी मद्यविक्री सुरु आहे त्या ठिकाणी गर्दी व मोठ्या रांगा लागत असल्याने अनेक तक्रारी येत असून कोरोनाचा प्रसार होण्याची भीती देखील आहे. यामुळे या सर्व बाबींपासून वाचण्यासाठी  हा इ टोकनचा हा मार्ग वापरण्याचा निर्णय घेतला आहे.  संकेत स्थळावर ही सुविधा पुरवण्यात आली आहे. या निर्णयामुळे मद्यप्रेमींना मद्य खरेदी करता येईल व सामाजिक शांतता अबाधित राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

 सदर वेबसाईट खाजगीरित्या पुणे येथील ठोक मद्य विक्रेते संघटनेने विकसित करून प्रकाशित व प्रसारित केलेली आहे. या पद्धतीने ऑनलाइन मद्य विक्री होत नसून फक्त  इ टोकन सिस्टीम' द्वारे दुकानांसमोर गर्दी टाळली जाते. या प्रणाली मुळे निश्चितच कोरोना च्या काळात गर्दी टाळण्यासाठी उपयोग होतो.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस