महापालिकेची ई निविदा प्रक्रियाच भ्रष्ट
By Admin | Updated: September 16, 2014 03:13 IST2014-09-16T03:13:36+5:302014-09-16T03:13:36+5:30
प्रभाग स्तरावरील कामांमध्ये पारदर्शकतेसाठी आणलेल्या ई निविदा प्रक्रियेतही मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आह़े

महापालिकेची ई निविदा प्रक्रियाच भ्रष्ट
मुंबई : प्रभाग स्तरावरील कामांमध्ये पारदर्शकतेसाठी आणलेल्या ई निविदा प्रक्रियेतही मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आह़े अंदाजे 1क्क् कोटींच्या या घोटाळाप्रकरणी 2क् अभियंत्यांना निलंबित करण्याची शिफारस दक्षता विभागाने केली आह़े तसेच सखोल चौकशीसाठी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आह़े
प्रभाग स्तरावरील छोटय़ा-छोटय़ा (तीन ते पाच लाखांर्पयतच्या) नागरी कामांसाठी आयुक्त सीताराम कुंटे यांनी ई निविदा पद्धत दोन वर्षापूर्वी आणली़ या पद्धतीला नगरसेवकांचा विरोध होत असतानाही आयुक्त ठाम राहिल़े परंतु ठरावीक ठेकेदारांचीच बिले लेखापाल विभागात जमा
होऊ लागल्यावर शंकेची पाल चुकचुकली़ चौकशीअंती ई निविदेतील घोटाळा उघड झाला़
आयुक्तांच्या अखत्यारीतील दक्षता विभाग (टाओ) यांनी हा घोटाळा उजेडात आला आह़े या प्रकरणी साहाय्यक व दुय्यम पदावरील 2क् अभियंते सहभागी असल्याचा ठपका टाओने ठेवला. परिमंडळ एकचे उपायुक्त वसंत प्रभू यांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असल्याचे प्रभारी आयुक्त राजीव जलोटा यांनी सांगितले. त्याचा अहवाल आल्यावर दोषींवर कारवाई होणार आह़े
च्ई-निविदेद्वारे तीन लाख व तीन ते पाच लाखांर्पयतच्या प्रभाग स्तरावरील कामांसाठी निविदा मागविण्यात येतात़ नियमांनुसार तीन लाखांसाठी तीन दिवस तर पाच लाखांच्या कामांसाठी सात दिवसांर्पयत ठेकेदारांना निविदा भरण्याची संधी असत़े परंतु निविदा भरण्याच्या पहिल्याच दिवशी ठरावीक ठेकेदाराने निविदा भरल्यानंतर लिंक ब्लॉक केली जात आह़े
च्जेणोकरून त्याच ठेकेदाराला कंत्रट मिळू शकेल़ आतार्पयत 6क्क् कोटींची कामे ई निविदेद्वारे देण्यात आली आहेत़ यापैकी तब्बल 1क्क् कोटींर्पयतची कामे मर्जीतील ठेकेदारांना वाटण्यात आल्याचे उजेडात आले आह़े यामुळे अधिकारी व ठेकेदारांमधील संगनमतही उघड झाल़े या प्रकरणी प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी सांगितल़े
शौचालयांची डागडुजी, खड्डे भरणो, गटारे व नाले तसेच जलवाहिन्यांची दुरुस्ती आदी कामांतील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी ई-निविदा आणली गेली होती.