ई-स्कॉलरशिपचा गोंधळ सुरूच

By Admin | Updated: February 1, 2015 01:41 IST2015-02-01T01:41:47+5:302015-02-01T01:41:47+5:30

सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ई-शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात येत आहेत.

E-scholarship mess | ई-स्कॉलरशिपचा गोंधळ सुरूच

ई-स्कॉलरशिपचा गोंधळ सुरूच

मुंबई : सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ई-शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशीही वेबसाईटचा गोंधळ कायम राहिल्याने अनेक विद्यार्थ्यांना मुदत संपली तरी अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे विभागाने अर्ज भरण्याची मुदत १0 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.
पोस्ट मॅट्रोकोत्तर शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जमाती आणि इतर मागास प्रवर्गासह इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी विभागाकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. परंतु संकेतस्थळातील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणींचा सामना करावा लागला. पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची शनिवारी अखेरची मुदत होती. शनिवार दुपारपर्यंत १५ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या तब्बल पावणे दोन लाखांनी कमी झाली आहे.
संकेतस्थळातील अचडणींमुळे अखेरच्या दिवशीही अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नाही. महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना मदत न केल्याने अद्यापही हजारो विद्यार्थ्यांना ई-स्कॉलरशिपसाठी अर्ज भरता आलेला नाही. त्यामुळे संकेतस्थळातील त्रुटी दुरूस्त करून अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ध्श्ई-स्कॉलरशिपमधून अर्ज भरता यावा, यासाठी आम्ही यापूर्वीही मुदतवाढ दिली होती. अनेक विद्यार्थी अखेरच्या दिवसापर्यंत अर्ज भरण्यासाठी प्रयत्न करतात, त्यामुळे संकेतस्थळावर ताण येतो. त्यामुळे एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नाही.
ज्या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत अर्ज भरता आला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यास १० फेब्रुवारीपर्यंत मुदत दिल्याचे, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त रणजीत सिंग देवोल यांनी
सांगितले.

पोस्ट मॅट्रोकोत्तर शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जमाती आणि इतर मागास प्रवर्गासह इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी विभागाकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. परंतु संकेतस्थळातील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणींचा सामना करावा लागला.

Web Title: E-scholarship mess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.