Join us

मुंबईत जूनअखेर धावणार ई-बाइक टॅक्सी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 14:34 IST

महेश कोले, प्रतिनिधीराज्य शासनाने ई-बाइक टॅक्सीबद्दलचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व ...

महेश कोले, प्रतिनिधी

राज्य शासनाने ई-बाइक टॅक्सीबद्दलचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाने नियमावली तयार केली आहे. ती लवकरच प्रसिद्ध होईल. त्यानंतर परवाने दिले जातील आणि ही सेवा मुंबईसह अन्य मोठ्या शहरांमध्ये जूनअखेरपर्यंत सुरू होईल. 

नियमावलीवर हरकती आणि सूचना -ई-बाइक टॅक्सी सेवेसाठी तयार करण्यात आलेली नियमावली या आठवड्यात प्रसिद्ध होईल. त्यानंतर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात येतील.  नागरिकांकडून आलेल्या सूचना आणि हरकतींवर विचार करण्यासाठी परिवहन विभागाला कसरत करावी लागणार आहे. यात कायदेशीर बाबी असतील तर त्यादेखील तपासाव्या लागणार आहेत. त्यासाठी आणखी काही आठवडे लागण्याची शक्यता आहे.चालकांसाठी नियम..? वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि ट्रान्स्पोर्ट बॅज आवश्यक चालकांसाठी पात्र वय : किमान २० आणि कमाल ५० वर्षे कामाचे तास : जास्तीत जास्त आठ तास 

नियमावलीत काय? ई-बाइकचा रंग कोणता असावा? ई-बाइकवर काय लिहिलेले असावे?सेवा सुरू करण्यासाठी नोंदणी कशी करावी? नोंदणी शुल्क किती असावे?प्रवाशांच्या तक्रारी असल्यास त्या कशा आणि कोणाकडे नोंदवाव्यात? 

 ई-बाइक टॅक्सीला मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत, दुचाकी परवाने देण्यात येतील. हे परवाने ५ वर्षांसाठी असतील. 

सुरक्षेसाठी उपाययोजना... केवळ १२ वर्षांवरील प्रवाशालाच बाइक टॅक्सीने प्रवासाची मुभा महिलांच्या सुरक्षेसाठी चालक आणि प्रवाशामध्ये विभाजक बंधनकारक पावसाळ्यात सुरक्षा कवच आवश्यकप्रत्येक ट्रिपसाठी कमाल अंतर १५ किलोमीटरपर्यंत  प्रवाशांबद्दल गोपनीयता आवश्यक   

जास्तीत जास्त किती राइड्स?रायडर्स शहराच्या हद्दीत दररोज जास्तीत जास्त चार आणि शहराबाहेर दोन राइड्स देऊ शकतात. तथापि, अशा पुलिंगदरम्यान ॲग्रिगेटर्सकडून कोणतेही कमिशन आकारले जाऊ शकणार नाही.परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी ॲग्रिगेटर्सकडे किमान ५० ई-बाइक असणे आवश्यक असणार आहे. नियमावलीत तशी तरतूद असेल.

टॅग्स :मुंबईटॅक्सी