रेल्वेची ‘डायनॅमिक’ लूट

By Admin | Updated: January 21, 2015 01:57 IST2015-01-21T01:57:21+5:302015-01-21T01:57:21+5:30

रेल्वेच्या तत्काळ तिकीट दरासाठी नवी प्रणाली लागू करण्यात आली आहे. या तिकीटांचा ५० टक्के कोटा संपल्यानंतर पुढील ५० टक्के तिकीटांसाठी वाढीव दर आकारण्यात येणार आहे.

'Dynamic' robbery of the railway | रेल्वेची ‘डायनॅमिक’ लूट

रेल्वेची ‘डायनॅमिक’ लूट

मुंंबई : रेल्वेच्या तत्काळ तिकीट दरासाठी नवी प्रणाली लागू करण्यात आली आहे. या तिकीटांचा ५० टक्के कोटा संपल्यानंतर पुढील ५० टक्के तिकीटांसाठी वाढीव दर आकारण्यात येणार आहे. तत्काळ तिकीटांच्या ५० टक्के कोट्याची विक्री झाल्यानंतर उर्वरित ५० टक्के तिकीटांसाठी प्रत्येकी १० टक्के तिकीटांच्या कोट्याला २० टक्क्यांप्रमाणे हे दर वाढत जाणार आहेत.
५० टक्के तिकिटे
प्रिमियम तत्काळ कोट्याप्रमाणे डायनेमिक दराच्या आधारावर मिळतील, असे सांगण्यात आले. तात्काळ तिकिटांना मिळणार प्रतिसाद पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.
तात्काळ कोट्यातील ५० टक्क्यांनंतर दिली जाणारी तिकिटे २० टक्के दरवाढीने प्रवाशांना देण्यास सुरुवात झाली. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ३ आॅक्टोबरपासून काही मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये ही योजना लागू केल्यानंतर आता आणखी २७ ट्रेनमध्ये ही योजना लागू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यात मध्य रेल्वे मार्गावरील १६ आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील ११ ट्रेनचा समावेश असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वे मार्गावरील १५ मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये ही योजना अगोदरच लागू करण्यात आली असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

११00५ दादर-पाँडेचेरी एक्स.
११0२१ दादर-तिरुनेलवेल्ली एक्स.
११0५0 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस-अहमदाबाद एक्स.
११0८८ पुणे-वेलावल एक्स.
११0९0 पुणे-भगत की कोठी एक्स.
११0९२ पुणे-भुज एक्स.

१२४७१ बान्द्रा टर्मिनस-जम्मू तवी स्वराज एक्सप्रेस
१२९१५ अहमदाबाद-नवी दिल्ली आश्रम एक्स.
१२९६१/६२ मुंबई सेन्ट्रल-इंदौर अवंतिका एक्स.
१९७0७ बान्द्रा टर्मिनस-जयपूर अरावली एक्स.
१२९0१/१२९0२ गजुरात मेल
१४७0८ बान्द्रा टर्मिनस-बिकानेर रणकपुर एक्स.
१२९0९ गरीब रथ एक्सप्रेस
१९0३७ गोरखपुर अवध एक्सप्रेस
१९0३९ मुजफ्फरपुर अवध एक्स.
१९0४५ गंगा एक्स.
१२९१९ जम्मू तावी मालवा एक्स.

११0९६ पुणे-अहमदाबाद अहिम्सा एक्स.
१२0५१ दादर-करमाळी जनशताब्दी एक्स.
१२१0१ एलटीटी-हावडा ज्ञानेश्वरी एक्स.
१२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्स.
१२८0९ सीएसटी-हावडा मेल व्हाया नागपूर
१६३५१ सीएसटी-नागरकोईल एक्स.

१६३८१ सीएसटी-कन्याकुमारी एक्स.
१८0२९ एलटीटी-शालिमार एक्स.
११0६१ एलटीटी-मुजफ्फरपुर एक्स.
११0६५ एलटीटी-दरभंगा एक्स.

Web Title: 'Dynamic' robbery of the railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.